मिक्सर ही घरातली अतिशय उपयुक्त वस्तू. पटकन मिक्सर फिरवला की, त्यातील साहित्य सेकंदात बारीक होते (Mixer Bottom). चटणी, वाटण, ज्यूस अशा रोजच्या आहारातल्या अनेक पदार्थांसाठी मिक्सरची गरज भासते (Cleaning Tips). मिक्सरचा वापर आपण रोजच्या रोज तर करतोच. पण दररोज आपण मिक्सर साफ करत नाही. मिक्सरचं भांडं आपण रोज साफ करतो. पण त्याचा खालचा भाग साफ करण्याचं राहून जातं.
मिक्सरच्या खालच्या भागात काळपट - मेणचट थर साचून राहतो, ज्यामुळे मिक्सर वेगानं फिरत नाही. जर मिक्सरच्या खालचा भाग साबणाने स्वच्छ करूनही साफ होत नसेल तर, बेकिंग सोड्याचा वापर करून पाहा. मिनिटात मिक्सरचं भांडं स्वच्छ होईल(Know How To Clean Mixer Grinder Jar, Blades and Lid).
मिक्सरचं भांडं स्वच्छ करण्याची सोपी ट्रिक
लागणारं साहित्य
बेकिंग सोडा
कोमट पाणी
अशा पद्धतीने करा मिक्सरचा खालचा भाग स्वच्छ
सर्वप्रथम, मिक्सरच्या खालच्या भागामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घालून पसरवा. त्यात एक कप कोमट पाणी ओता. १० मिनिटानंतर टूथब्रशने घासून स्वच्छ करा, व पाण्याने धुवून घ्या. अशा प्रकारे मेहनत न घेता मिक्सरच्या खालचा भाग स्वच्छ होईल.
मांडी घासली जाऊन आगआग होते? ४ घरगुती टिप्स; मिनिटात लालसर झालेली त्वचा होईल नॉर्मल
दुसरी ट्रिक
मिक्सरचा खालचा भाग स्वच्छ करण्यासाठी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून बेकिंग सोडा, डिटर्जंट पावडर, मीठ आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. मिक्सरच्या खालच्या भागावर कोणतेही डिशवॉश लिक्विड स्प्रे करून घ्यावे. त्यानंतर एका जुन्या टूथब्रशच्या मदतीने तयार करून घेतलेली पेस्ट मिक्सरच्या खालच्या भागावर लावून मिक्सर घासून घ्यावा. काही वेळानंतर भांडं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे.