Lokmat Sakhi >Social Viral > दिवाळीच्या साफसफाईत खिडक्या साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स, धूळ जाऊन खिडक्या होतील स्वच्छ....

दिवाळीच्या साफसफाईत खिडक्या साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स, धूळ जाऊन खिडक्या होतील स्वच्छ....

Know How To Clean Windows in Diwali Cleaning tips : हे सगळे नीट बारकाईने साफ करायचे तर त्यासाठी योग्य नियोजन हवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2023 09:40 AM2023-11-07T09:40:32+5:302023-11-07T09:45:02+5:30

Know How To Clean Windows in Diwali Cleaning tips : हे सगळे नीट बारकाईने साफ करायचे तर त्यासाठी योग्य नियोजन हवे

Know How To Clean Windows in Diwali Cleaning tips : 4 easy tricks to clean windows in Diwali cleaning, dust will go away and windows will be clean.... | दिवाळीच्या साफसफाईत खिडक्या साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स, धूळ जाऊन खिडक्या होतील स्वच्छ....

दिवाळीच्या साफसफाईत खिडक्या साफ करण्याच्या ४ सोप्या ट्रिक्स, धूळ जाऊन खिडक्या होतील स्वच्छ....

दिवाळीची साफसफाई म्हटलं की अगदी भिंती, दारं, खिडक्या घराचे कानेकोपरे साफ केले जातात. वर्षातून एकदा येणारा हा मोठा सण महाराष्ट्रात आणि देशातही बऱ्याच ठिकाणी मराठी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. आपल्या घराचे रुप पालटून टाकण्यासाठी घराला रंग देणे, नवीन वस्तू खरेदी करणे आणि घर स्वच्छ करणे अशी मोठी मोहिम या निमित्ताने आखली जाते. घराच्या खिडक्या ही घाण साठण्याची एक महत्त्वाची जागा असून धूळ, कचरा यांमुळे या खिडक्या खूप खराब होतात. गेल्या काही वर्षांपासून स्लायडींग विंडोची फॅशन आली असून या स्लायडींगमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचते, काचा खराब होतात आणि खिडक्यांच्या ग्रिलमध्येही खूप जास्त प्रमाणात घाण साचते. हे सगळे नीट बारकाईने साफ करायचे तर त्यासाठी आपल्याला पूर्ण १ दिवस लागतो. आता खिडक्या साफ करण्यासाठी झटपट वापरता येतील अशा सोप्या ट्रिक्स कोणत्या ते पाहूया (Know How To Clean Windows in Diwali Cleaning tips)...

काचा साफ करण्यासाठी..

१. व्हिनेगर 

व्हिनेगरच्या साह्याने खराब झालेल्या काचा साफ होण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये व्हिनेगर भरुन घ्या. आता जेव्हा तुम्हाला काचा साफ करायच्या असतील तेव्हा हे स्प्रे बॉटलमधील व्हिनेगर खिडक्यांवर स्प्रे करा. त्यानंतर एखाद्या स्वच्छ सुती कपड्याने काचा पुसून घ्या. यामुळे काचांचा पारदर्शकपणा इतका छान होईल की समोर काच आहे की नाही हेही आपल्याला समजणार नाही.

२. डीश सोप

डीश सोप हा तर आपल्या प्रत्येकाच्या घरात असतोच. या साबणाने भांडी ज्याप्रमाणे चकचकीत आणि स्वच्छ होतात त्याचप्रमाणे काचाही अतिशय स्वच्छ होण्यास मदत होते. यासाठी हा साबण किंवा लिक्विड सोप आणि पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये एकत्र करा. काचांवर हे पाणी स्प्रे करुन चांगल्या फडक्याने काचा स्वच्छ पुसून घ्या. 

३. बेकींग सोडा 

बेकींग सोडा हा साफसफाईच्या कामासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे. घरातल्या खिडक्यांच्या काचा साफ होण्यासाठी बेकींग सोड्याचा उपयोग केला जातो. यासाठी थोडासा बेकींग सोडा एका मऊसूत कापडावर लावून त्याने काच पुसा. त्यानंतर पुन्हा एक सुती कापड घेऊन पाण्याच्या साह्याने खिडक्या साफ करणे गरजेचे आहे. यामुळे काचा एकदम चमकदार दिसण्यास मदत होईल. 

(Image : Google )
(Image : Google )

स्लायडींग साफ करताना...

स्लायडींगमध्ये खूप जास्त प्रमाणात घाण अडकते. ही घाण साफ करण्यासाठी आजकाल बाजारात बरीच उपकरणे मिळतात. त्याने यामधली धूळ, कचरा अगदी सहज निघून येतो. मात्र ही उपकरणे वापरण्याची ट्रिक नीट समजून घेणे महत्त्वाचे असते. ओले फडके करुन त्याने ही धूळ आणि घाण काढण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा चांगला उपयोग होतो.  


 

Web Title: Know How To Clean Windows in Diwali Cleaning tips : 4 easy tricks to clean windows in Diwali cleaning, dust will go away and windows will be clean....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.