Join us  

दसऱ्यासाठी विकतचे महागडे हार कशाला? घरीच करा झेंडूच्या फुलांचे विकतसारखे सुंदर हार, पाहा सोप्या पद्धती...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2023 3:12 PM

Know How to Make Marigold Flowersa garland for Dasra Zendu Har : हार कसे बनवायचे याचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध असल्याने ते पाहून आपण अगदी सहज हार तयार करु शकतो.

दसरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते पाटीपूजन, शस्त्रपूजन, आपट्याची पाने, झेंडूची फुले आणि त्यांचे हार. दसऱ्याच्या दिवशी आपण घराच्या दाराला, देवाला, ऑफीसला असे सगळीकडे हे भरगच्च हार लावत असल्याने या हारांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे बाजारात हे हार नेहमीपेक्षा दुप्पट ते तिप्पट किमतीने विकले जातात. अगदी १५० ते २०० रुपयांपासून सुरू होणारे हे हार १००० रुपयांपर्यंत मिळतात. पण आपल्याकडे थोडासा वेळ आणि आवड असेल तर हाराचा दोरा आणि सुई घेऊन घरच्या घरी विविध कॉम्बिनेशनचे हे हार आपण घरीही अगदी सहज बनवू शकतो. यासाठी खूप जास्त कल्पकता असावी लागते असे नाही याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आता हार कसे बनवायचे याचे बरेचसे व्हिडिओ युट्यूबवर उपलब्ध असल्याने ते पाहून आपण अगदी सहज हार तयार करु शकतो (Know How to Make Marigold Flowersa garland for Dasra Zendu Har). 

(Image : Google )

हार बनवण्याची ट्रिक एकदा लक्षात आली की त्यात जास्त काही अवघड नसते. दोरा आणि विविध रंगाची फुले, आंब्याची डहाळी किंवा पाने यांचा वापर करुन तयार केलेले हे हार अतिशय सुंदर होतात. फक्त यासाठी हाराचाच दोरा आणि मोठी दाभण वापरल्यास फुलं आणि पानं यामध्ये जाणे सोयीचे होते. यामध्ये आपल्याला एकसलग हार, मध्यभागी गोंडा किंवा तोरणाप्रमाणे झालर असलेला हार असे बरेच प्रकार करता येऊ शकतात. हे हार करणे सोपे काम वाटत असले तरी काही वेळ सलग बसावे लागत असल्याने पान आणि मान एक होण्याची शक्यताही यामध्ये नाकारता येत नाही. त्यामुळे आपल्याला जमेल, झेपेल अशीच डीझाईन निवडून त्यानुसार हाराची रचना करायला हवी. 

टॅग्स :सोशल व्हायरलदसरा