Lokmat Sakhi >Social Viral > घाईच्या वेळी लिपस्टीक, काजळ सापडतच नाही, ड्रेसिंग टेबल नीटनेटकं ठेवण्याची सोपी ट्रिक...

घाईच्या वेळी लिपस्टीक, काजळ सापडतच नाही, ड्रेसिंग टेबल नीटनेटकं ठेवण्याची सोपी ट्रिक...

Know How To Organize Makeup Products : घरात असलेल्या टाकाऊ गोष्टींचा आपण वापर करुन आपण ड्रेसिंग टेबल छान ठेवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2023 11:58 AM2023-05-30T11:58:37+5:302023-05-30T12:06:02+5:30

Know How To Organize Makeup Products : घरात असलेल्या टाकाऊ गोष्टींचा आपण वापर करुन आपण ड्रेसिंग टेबल छान ठेवू शकतो.

Know How To Organize Makeup Products : Lipstick in a hurry, can't find grime, easy trick to keep dressing table tidy... | घाईच्या वेळी लिपस्टीक, काजळ सापडतच नाही, ड्रेसिंग टेबल नीटनेटकं ठेवण्याची सोपी ट्रिक...

घाईच्या वेळी लिपस्टीक, काजळ सापडतच नाही, ड्रेसिंग टेबल नीटनेटकं ठेवण्याची सोपी ट्रिक...

ऑफीसला किंवा कुठेही बाहेर जाताना आपण छान आवरतो. काहीच नाही तर किमान काजळ आणि लिपस्टीक तरी आवर्जून लावतो. घाईच्या वेळी आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये ठेवलेल्या गोष्टी पटकन सापडाव्यात अशी आपली किमान अपेक्षा असते. पण त्यात इतकी पसारा झालेला असतो की आपल्याला जे हवं ते अजिबात सापडत नाही. आपल्या आवडीचं एखादी क्लिप किंवा हेअर रबर हेही त्या पसाऱ्यात कुठे दडलेलं असतं कळत नाही. मग घरातून निघताना नीट आवरता आलं नाही म्हणून आपली एकतर चिडचिड होते नाहीतर जिथे पोहोचायचं आहे तिथे आपण फार उशीरा पोहोचतो. पण आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये पसारा होऊ नये आणि ते नीट आवरलेलं राहावं यासाठी आपण काही सोप्या ट्रिक्स वापरु शकतो. यासाठी घरात असलेल्या टाकाऊ गोष्टींचा आपण वापर करु शकतो. पाहूयात मेकअपचे सामान नीट ठेवण्यासाठी नेमकं काय करायचं (Know How To Organise Makeup Products). 

१. आपण मोबाइल किंवा घड्याळ विकत घेतो तेव्हा त्याचे बॉक्स जाड अशा पुठ्ठ्याचे असतात. हे बॉक्स फेकून न देता ते नीट जपून ठेवावेत. या बॉक्सच्या वरचा आणि खालचा भाग अशा दोन्हीचा आपल्याला यामध्ये उपयोग होऊ शकतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. आता हे बॉक्स पसरट असल्याने यात वस्तू ठेवल्या तरी त्या पसरतात. मात्र असे होऊ नये यासाठी आपण आणखी एक सोपी ट्रिक वापरु शकतो. केसांना बांधण्याचे नको असलेले किंवा जुने झालेले हेअर बो आपण या बॉक्सला कंपार्टमेंट करण्यासाठी वापरु शकतो. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बॉक्सला हे बँड लावल्यास आपल्याला हवे तितके आणि हव्या त्या आकाराचे कंपार्टमेंट करता येतात. 

३. या बॉक्सला कडेनी एखादा गडद रंगाचा सेलोटेप लावल्यास हे बॉक्स टाकाऊतून टिकाऊ न वाटता त्यांना एकप्रकारचा हटके लूक येतो. तसेच त्याच्या खाली बबल पेपर किंवा प्लास्टीकचा कोणताही चांगला कागद घातल्यास बॉक्स स्वच्छ राहण्यास मदत होते. 

४. नेलपेंटच्या बाटल्या, परफ्यूम, फाऊंडेशन पावडर, ब्लशर किंवा आयशॅडोचे पॅलेट, लिप बाम, आयलायनर, काजळ, लिपस्टीक अशा सगळ्या गोष्टी या कंपार्टमेंटमध्ये आपण आपल्या सोयीनुसार ठेवू शकतो. यामुळे एखादी गोष्ट वापरण्यासाठी काढल्यास ती पुन्हा त्याच जागेवर ठेवल्यास ती पुढच्या वेळी सापडणे सोपे जाते. 

Web Title: Know How To Organize Makeup Products : Lipstick in a hurry, can't find grime, easy trick to keep dressing table tidy...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.