Join us  

कडीपत्ता वाळून न जाता हिरवागार राहण्यासाठी १ सोपी ट्रिक, ३ आठवडे कडीपत्ता राहील ताजा-फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2023 12:56 PM

know How to Store Curry Leaves fresh for long : कडीपत्ता आहे तसा हिरवागार राहण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

मसाल्यातील एक पदार्थ म्हणून ओळखला जाणारा कडीपत्ता आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. पदार्थाला चव येण्यासाठीही आपण फोडणीत आवर्जून कडीपत्ता घालतो. विविध आजारांबरोबरच केसांसाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडीपत्ता फायदेशीर ठरतो. हा चविष्ट हिरवागार कडीपत्ता अनेकदा घरी आणला  एक किंवा दोन दिवस चांगला राहतो, नंतर लगेचच वाळून जातो. वाळला की कडीपत्त्याची पूर्ण चवच जाते, काही वेळा तर हा कडीपत्ता इतका काळा पडतो की तो फेकून द्यावा लागतो.पण हिरवागार कडीपत्ता असेल तर तो पदार्थात घालायलाही छान वाटतो. बाजारात अगदी ५ ते १० रुपयांत कडीपत्त्याची मोठी जुडी मिळते (know How to Store Curry Leaves fresh for long). 

आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असणारा आणि जेवणाचा स्वाद वाढवणारा हा कडीपत्ता बरेच दिवस तसाच राहावा यासाठी काय करता येईल? याचीच एक सोपी ट्रिक आज आपण पाहणार आहोत. ज्यामुळे हा कडीपत्ता चांगला १५ ते २० दिवस आहे तसाच छान हिरवागार राहू शकतो.यामुळे कडीपत्ता आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाही. शरीराला तो खाऊन पोषण मिळेल ते वेगळंच. म्हणूनच कडीपत्ता आहे तसा हिरवागार राहण्यासाठी नेमकं काय करायचं पाहूया...

१. कडीपत्ता बाजारातून आणल्यावर देठांपासून वेगळा न करता साध्या पाण्यात घालून धुवून घ्यायचा. 

(Image : Google)

२. त्यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात व्हिनेगर घालायचे आणि त्यात हा कडीपत्ता घालायचा. 

३. व्हिनेगरच्या पाण्यात साधारण १५ ते २० मिनीटे कडीपत्ता चांगला भिजत ठेवायचा. 

४. मग एका कोरड्या नॅपकीनवर हा कडीपत्ता वाळत घालायचा आणि त्यातले सगळे पाणी नीट निथळेल असे पाहायचे.

५. मग एका डब्यात खाली टिश्यू पेपर घालून त्यावर या काड्यांना असलेली कडीपत्त्याची पाने काढून त्यावर ती पसरुन ठेवायची.

६. पाने डब्यात भरल्यानंतर वरच्या बाजूनेही टिश्यू पेपर घालायचा म्हणजे पानांमध्ये काही मॉईश्चर राहिले असेल तर ते निघून जाण्यास मदत होईल.

७. डबा बंद करुन तो फ्रिजमध्ये ठेवल्यास हा कडीपत्ता २ ते ३ आठवडे अगदी छान हिरवागार राहण्यास मदत होते. 

टॅग्स :सोशल व्हायरलकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.