Lokmat Sakhi >Social Viral > कडीपत्ता लगेच वाळून जातो? साठवण्याची १ सोपी ट्रिक, ६ महिने कडीपत्ता राहील ताजा-फ्रेश

कडीपत्ता लगेच वाळून जातो? साठवण्याची १ सोपी ट्रिक, ६ महिने कडीपत्ता राहील ताजा-फ्रेश

know How to Store Curry Leaves fresh for long : कडीपत्ता वाळून वाया न जाता पोटात गेला तर आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2024 12:47 PM2024-01-24T12:47:08+5:302024-01-24T12:48:59+5:30

know How to Store Curry Leaves fresh for long : कडीपत्ता वाळून वाया न जाता पोटात गेला तर आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले...

know How to Store Curry Leaves fresh for long : Does the leaf dry out immediately? 1 easy storage trick, 6 months of kadipatta will stay fresh | कडीपत्ता लगेच वाळून जातो? साठवण्याची १ सोपी ट्रिक, ६ महिने कडीपत्ता राहील ताजा-फ्रेश

कडीपत्ता लगेच वाळून जातो? साठवण्याची १ सोपी ट्रिक, ६ महिने कडीपत्ता राहील ताजा-फ्रेश

कडीपत्ता हा ओल्या मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने आपण भाजी, आमटीला फोडणी देताना आवर्जून कडीपत्त्याचा वापर करतो. इतकंच नाही तर कडीपत्त्याची चटणीही केली जाते. पदार्थाला चव आणि स्वाद आणणारा हा कडीपत्ता आरोग्याबरोबरच केस आणि त्वचेच्या सौंदर्यासाठीही उपयुक्त असतो. हा चविष्ट हिरवागार कडीपत्ता अनेकदा घरी आणला  एक किंवा दोन दिवस चांगला राहतो आणि नंतर लगेचच वाळून जातो. एकदा कडीपत्ता वाळला की त्याची चव जाते आणि स्वादही उतरतो. काही वेळा तर फ्रिजमध्ये नीट ठेवूनही हा कडीपत्ता काळा पडतो. एकदा कडीपत्त्याची पानं वाळली किंवा तो काळा पडला की तो फेकून द्यावा लागतो. (know How to Store Curry Leaves fresh for long). 

 सतत बाजारात जाऊन भाजीपाला खरेदी करणे शक्य नसल्याने आपण आठवड्याच्या भाजीसोबतच मसाला आणतो. पण वाळलेला कडीपत्ता अशाप्रकारे वाया न जाता आपल्या पोटात गेला तर आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले असते. म्हणूनच कडीपत्ता बरेच दिवस ताजा राहण्यासाठी आणि स्वयंपाकात वापरता यावा यासाठी तो साठवण्याची १ सोपी पद्धत आज आपण पाहणार आहोत.  ज्यामुळे हा कडीपत्ता चांगला १५ ते २० दिवस आहे तसाच छान हिरवागार राहू शकतो.यामुळे कडीपत्ता आणि पैसे दोन्हीही वाया जाणार नाही.पाहूयात कडीपत्ता साठवण्याची सोपी ट्रिक...

(Image : Google)
(Image : Google)

१. सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्यायचा. 

२. पाण्यातून काढलेला कडीपत्ता एका कापडावर टाकून टिश्यू पेपरने तो स्वच्छ पुसून शक्य तितका कोरडा करायचा.

३. देठांपासून पाने वेगळी करायची आणि गॅसवर एका पॅनमध्ये घालून बारीक फ्लेमवर भाजायची. 

४. यामुळे कडीपत्त्यातील मॉईश्चर जाऊन तो पूर्ण कोरडा आणि कुरकुरीत होतो. 

५. हा भाजलेला कडीपत्ता थोडा गार झाला की एका हवाबंद बरणीत भरुन ठेवायचा आणि गरज असेल तेव्हा वापरायचा.

६. मूळ भाजताना कडीपत्ता ताजा असल्याने अशापद्धतीने कोरडा केलेल्या कडीपत्त्याचा स्वाद आहे तसाच टिकून राहतो. 

Web Title: know How to Store Curry Leaves fresh for long : Does the leaf dry out immediately? 1 easy storage trick, 6 months of kadipatta will stay fresh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.