बरेच वर्ष चाललेल्या वादानंतर आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर आयोध्येतील राममंदिर काही तासांत दर्शनासाठी खुले होणार आहे. तब्बल ३२- ३३ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर आयोध्या नगरीत रामाचे भव्यदिव्य मंदिर उभे राहणार असून देशभरातील वातावरण राममय झाले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात या राममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून वेगवेगळ्या मार्गाने प्रत्येक जण आपल्या मनातील रामाची पूजा, आराधना करताना दिसत आहे. अशातच एका तरुणीने गायलेले रामाचे भजन सोशल मीडियावर सगळ्यांचेच लक्ष वेधत आहे. विशेष म्हणजे 'राम आऐंगे' हे भजन गाणाऱ्या तरुणीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही विशेष कौतुक केले आहे (Know who is Swati Mishra singer who praised by Pm Narendra Modi for Ram aayenge Bhajan).
'मेरी झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे आंगना सजाऊंगी' हे भजन स्वाती मिश्रा यांनी गायले. हे गाणे मोदीजींनी ऐकल्यावर त्यांनी तिचे कौतुक तर केलेच आणि उद्घाटन सोहळ्याला हे गाणे गाण्यासाठी निमंत्रणही पाठवले. पंतप्रधानांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन खास ट्विट करुन तिच्या गायकीचे कौतुक केले आहे. रामलल्लाच्या स्वागतासाठी स्वाती मिश्रा यांचे भक्तीभावाने भरलेले हे भजन मंत्रमुग्ध करणारे असेल अशी कॅप्शन या पोस्टला देण्यात आली आहे. त्यांनी गायलेले रामाचे गाणे अतिशय सुंदर असून व्हिडिओमध्ये त्या स्टुडिओत गाताना दिसत आहेत. साधारण ३.३० मिनीटांचे हे गाणे भक्तिभावाने भरलेले असून ते ऐकताना आपणही मंत्रमुग्ध होऊन जातो.
कोण आहे स्वाती मिश्रा?
मूळच्या बिहारच्या असलेल्या स्वाती यांना लहानपणापासून गायनाची आवड आहे. आपल्या गाण्याचे बरेच व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. गाण्यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने स्वाती मुंबईत आल्या असून त्यांचे ३ युट्यूब चॅनेल आहेत. या सर्व चॅनेलसवर लाखो सबस्क्रायबर असून असंख्य जणांनी त्यांनी गायलेले हे रामाचे गाणे ऐकलेले आहे. विविध इव्हेंटसमध्ये स्वाती आपल्या गाण्याचे सादरीकरण करत असल्याने त्यांचा चाहतावर्ग मोठा आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये स्वाती यांनी राम आऐंगे हे गाणे पोस्ट केले होते आणि त्याला अवघ्या ४ महिन्यात ४७ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.