Korean Father Singing Hindi Song Video: सोशल मीडियावर लहान मुलं आणि त्यांच्या पालकांचे अनेक इंटरेस्टींग व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक वडील आणि मुलाचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा व्हिडीओ कोरियातील असूनही याची भारतात जास्त चर्चा होत आहे. कारण यातील कोरियन वडील आपल्या बाळाला झोपवण्यासाठी बॉलिवूडचं लोकप्रिय गीत "चंदा है तू, मेरा सूरज है तू" गाताना दिसत आहे. लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला असून या व्यक्तीचं कौतुक करत आहेत.
"चंदा है तू, मेरा सूरज है तू" हे गाणं श्रोत्यांच्या खूप मनाजवळ आहे. कारण हे गाणं लहान मुलांना झोपवण्यासाठी अंगाई गीत म्हणूनही गायलं जातं. व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे वडील आपल्या बाळाला जवळ घेऊन प्रेमानं हे गाणं म्हणत आहे. या वडिलाचा आवाज आणि बाळाची निरागसता पाहून लोक इमोशनलही होत आहेत.
कोरियन व्यक्तीचा हा व्हिडीओ पाहून यूजरने लिहिलं की, "हा व्हिडीओ बघून माझं मन गहिवरलं. फार सुंदर". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "तुला या जगातील सगळ्यात बेस्ट वडील मिळाले आहेत". तर तिसऱ्यानं लिहिलं की, "एक वडील आणि मुलाचं सगळ्यात सुंदर नातं, आवडलं". चौथ्यानं लिहिलं की, "पॅरेंटींग प्रेम आणि काळजीचं नाव आहे, याला भाषेच्या सीमा नाहीत".
दरम्यान, हे पहिल्यांदाच नाही की, एखाद्या परदेशी व्यक्तीनं भारतीय गीत गायलं. याआधीही परदेशी व्यक्तींचे हिंदी गीत गातानाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. बॉलिवूड गाणी जगभरात फेमस आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ बघायला मिळतील. व्हिडिओतून हे स्पष्ट होतं की, संगीताची कोणतीही भाषा नसते, ते थेट मनाला भिडतं.