Join us

कोरीयन मुलींनी केले सुंदर पारंपरिक भारतीय नृत्य! पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे फिटेल पारणे.. नेटीझन्स म्हणाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 16:46 IST

Korean Girls Indian Traditional Dance Cultural Meet Viral Video : संस्कृती एकमेकांना भेटतात तेव्हा त्याहून सुंदर काही असूच शकत नाही

ठळक मुद्दे सोशल मीडियावर या दोघींचे भरपूर कौतुक होत असून लोकांना त्यांचा डान्स खूप आवडत आहे. या व्हिडिओला ५ लाखांहून जास्त व्ह्यू मिळाले असून २१ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे.

नृत्य म्हटलं की त्यात असंख्य प्रकार, पद्धती पाहायला मिळतात. प्रत्येक देशाचे, राज्याचे नृत्यप्रकार वेगवेगळे असतात. हे नृत्यप्रकार त्या त्या देशातील लोकांनी सादर केले तर ठिक आहे. पण दुसऱ्या देशातील लोकांनी भारतीय पारंपरिक नृत्याचे सादरीकरण करणे ही भारतीयांसाठी नक्कीच आनंदाची बाब आहे. सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामध्ये कोरीयन तरुणी भारतीय नृत्य करताना दिसत आहेत. जेव्हा २ संस्कृती एकमेकांना भेटतात तेव्हा त्याहून सुंदर काही असूच शकत नाही अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर mylovefromkora17 या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. व्यासपीठावर साऊथ कोरीया आणि भारत यांचा झेंडाही लावलेला दिसत आहे (Korean Girls Indian Traditional Dance Cultural Meet Viral Video). 

(Image : Google)

या दोन्ही तरुणी करत असलेले नृत्य ओडीसी आणि कथक असल्याचे दिसते. ओडीसी नृत्य करणाऱ्या तरुणीने गुलाबी रंगाची नऊवारी साडी नेसली असून तिने परफेक्ट तसा गेट अप केला आहे. तर कथक नृत्य करणाऱ्या तरुणीनेही मोरपंखी रंगाचा ड्रेस घालून त्यावर केशरी रंगाची ओढणी घेत आपला कथकचा लूक परफेक्ट केला आहे. या दोघीही अतिशय सुंदर असे फ्यूजन सादर करत असून त्या कोरीयन असल्यासारखे कुठेच वाटत नाही. भारतीय नृत्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जा आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव यांमुळे आपल्याला त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही. 

या व्हिडिओला ५ लाखांहून जास्त व्ह्यू मिळाले असून २१ हजारहून अधिक जणांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्हिडिओ पाहून या महिला भारतीय क्लासिकल डान्सर आहेत असे वाटल्याशिवाय राहत नाही. सोशल मीडियावर या दोघींचे भरपूर कौतुक होत असून लोकांना त्यांचा डान्स खूप आवडत आहे. ‘या दोघी किती सुंदर करत आहेत’, ‘आम्हालाही असा डान्स करायला आवडेल’. ‘याआधी आपण असे कधीच पाहिले नाही’ अशा एकाहून एक प्रतिक्रिया या व्हिडिओवर आल्या आहेत. ‘हा डान्स पाहून माझ्या अंगावर शहारे आले’असेही एकीने म्हटले आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियानृत्य