बॉडी शेमिंग म्हणजे एखाद्याला त्याच्या शरीराच्या ठेवणीवरुन टोकणे किंवा त्यावर कमेंटस करणे . गेल्या काही काळात त्याविरोधात आवाज उठवणे यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र तरीही असे करण्याचे प्रमाण काही कमी झालेले नाही (Social Media Trolling). कोणाच्या शरीरावर चुकीची टिपण्णी करणे म्हणजेच बॉडी शेमिंग. महिलांच्या बाबतीत कधी त्यांच्या जाडीवरुन तर कधी जास्त बारीक असण्यावरुन बॉडी शेमिंग (Body Shaming) केले जाते. अभिनेत्रींच्या बाबतीत तर हे सर्रास घडत असून अनेकींना या बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. नुकताच अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) हिचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ती बॉडी शेमिंगची शिकार झाली.
क्रिती सेनन ही केवळ तिच्या अभिनयासाठीच नाही तर तिच्या फिटनेससाठीही प्रसिद्ध आहे. त्याचे झाले असे की क्रिती सेननने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लेटेस्ट वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती बॅक स्ट्रेच करताना दिसत आहे. बॅक स्ट्रेचिंग किती महत्त्वाचे आहे हे दाखवण्यासाठी क्रितीने हा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये कृती आपल्या जीम ट्रेनरसोबत स्ट्रेचिंग करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ट्रेनरच्या मदतीने काहीसे अवघड असे स्ट्रेचिंग क्रिती करताना दिसते. यावेळी ती करत असलेला व्यायाम आणि त्याचे महत्त्व याकडे लक्ष देण्याचे सोडून लोकांनी तिच्या शरीराच्या ठेवणीवर कमेंट करायला सुरूवात केली आहे. नेटीझन्सनी अतिशय खराब भाषेत तिच्या शरीरावर टिपण्णी केली असल्याचे या व्हिडिओच्या कमेंटसमध्ये दिसत आहे.
क्रितीने अशाप्रकारे व्यायामाचा व्हिडिओ पहिल्यांदाच पोस्ट केला आहे असे नाही. तर याआधीही तिने अशाप्रकारचे व्हिडिओ शेअर केले आहेत. क्रितीचे सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोइंग असून २ दिवसांपूर्वी अपलोड केलेला हा व्हिडिओ आतापर्यंत जवळपास ९ लाख लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर क्रितीचे कौतुक केले असून काहींनी मात्र या व्हिडिओवर वाईट कमेंटस करत बॉडी शेमिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. कमेंटसमध्ये नेटीझन्स तिला ‘टोटली फ्लॅट’, म्हटले आहे. तर काहींनी ‘कुछ भी नही है आगे तुम्हारे’ असं म्हणत तिची खिल्ली उडवली आहे. याआधीही क्रितीवर बॉडी शेमिंग करणाऱ्या कमेंटस करण्यात आल्या होत्या. मात्र त्यावेळी तिने “मी जशी आहे तशी छान आहे. त्यामुळे मला निसर्गाने दिलेल्या गोष्टींमध्ये कोणताही बदल करायचा नाही. मी प्लास्टीकची बाहुली नाही, त्यामुळे लोक काहीही बोलले तरी त्याकडे कुठपर्यंत लक्ष द्यायचे हे मला माहित आहे.” असे रोखठोक उत्तर दिले होते.