हल्ली हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या हातातही त्यांचा स्वत:चा पर्सनल मोबाईल दिसतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मिडियाचे अपडेट्स पाहण्यासाठी तो मोबाईल दिवसातून अक्षरश: शेकडो वेळा अनलॉक होत असतो (busy with the social media). आपले अपडेट्स त्यावर टाकणं आणि दुसऱ्यांचे शेअरिंग बघत बसणं, यात आजची तरुण मुले तासनतास रमलेली आहेत. पण स्वत:ला असंच सोशल मिडियात गुंतवून ठेवाल आणि त्यानुसार कायम 'फिल्टर' जगत रहाल, खोटं खोटं हसत राहाल तर भविष्यात 'डिप्रेस' व्हाल, असा सल्ला अभिनेत्री क्रिती सेनन हिने आजच्या तरुणाईला दिला आहे. (Kriti Sanon's special advice to the youngsters)
क्रिती सेनन हिच्या मुलाखतीमधला एक छोटासा तुकडा इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तिने सोशल मिडियाच्या जंजाळात वाढणाऱ्या तरुणाईविषयी काळजी व्यक्त केली आहे.
साडीचा पदर झुळझुळत मोकळा सोडायला आवडतो, पण सांभाळता येत नाही? १ स्मार्ट ट्रिक, पदर सावरणं होईल सोपं
ती म्हणते की हल्ली आपण सोशल मिडियाशी खूप जास्त कनेक्ट झालो आहोत. त्यामुळे आपल्याला सगळं सुंदर- छान, परफेक्ट, प्रत्येक गोष्ट फिल्टर केलेली.... असं बघण्याची सवय झाली आहे. लोकांना आपण तसं बघतो, म्हणून स्वत:लाही आपण तसंच करू लागलो आहोत. प्रत्येक वेळी स्वत:ला आपण 'फिल्टर' करून जगासमोर आणतो आहे. वास्तवात आपण तसे नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण आपण परफेक्ट, छान, सुंदरच असावं किंबहुना लोकांनी आपल्याला तसंच बघावं, असा आपला अट्टाहास आहे.
पण असं नेहमीच होऊ शकत नाही. नेहमी आपण स्वत:ला परफेक्ट करून लोकांसमोर आणू शकत नाही. प्रत्येक वेळी सुंदरच दिसू शकत नाही. प्रत्येक वेळी सोशल मिडियाच्या स्टॅण्डर्डनुसारच स्वत:ला ॲडजस्ट करू शकत नाही.
मुलांना सर्दी- खोकला झाला? उघडा आजीबाईंचा बटवा- ३ पदार्थ करतील औषधांचं काम- त्रास होईल कमी
कारण ते शक्यच नाही. पण आपण हा हट्ट सोडलाच नाही, तर नक्कीच डिप्रेशन येऊ शकतं. त्यामुळे कधीतरी तुम्ही जसे आहात तसे, तुमच्यातल्या गुणदोषांसकट स्वत:ला स्विकारा, स्वत:ला अनफिल्टर करून तुम्ही वास्तवात जसे आहात, तसे कधीतरी लोकांसमोर या..