सध्या सर्वत्र पॅरिस फॅशन वीकची चर्चा पाहायला मिळत आहे. १७ जानेवारीपासून सुरू असलेल्या पॅरिस फॅशन वीक २०२३ मध्ये समर-स्प्रिंग कलेक्शन दाखवण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक पाहायला मिळत आहेत. कायली जेनर (Kylie Jenner) अमेरिकेतील प्रसिद्ध व्यक्तीमत्त्व, मॉडेल आणि उद्योजिका आहे. कायली जेनरचा समावेश आज जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत होतो. अमेरिकन अभिनेत्री कायली जेनर हीने सोशल मीडियावर एक नवा विक्रम केला आहे. तिची खास गोष्ट म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी तिने अमाप लोकप्रियता मिळवलेली होती. अद्याप तिची ही लोकप्रियता अजून टिकून आहे. कायली जेनरचे इंस्टाग्रामवर ३०० मिलियन (३० कोटी) फॉलोअर्स झाले आहेत. हा आकडा पार करणारी ती पहिली महिला ठरली आहे.
इतकेच नव्हे तर ती ‘फोर्ब्स’ मासिकाच्या प्रकाशित होणाऱ्या अमेरिकेतील ‘स्व-कर्तृत्वानं बिलिओनियर झालेल्या महिलांची यादी असलेल्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकली आहे.२०१६ साली कायलीनं आपल्या मॉडेलिंगमधून मिळालेल्या पैशाचा वापर करत ‘Kylie Cosmetics’ नावाची एक कंपनी स्थापन केली. तिनं या कंपनीमार्फत स्त्रियांच्या ओठांना सुंदर आकार देण्यासाठी एक ‘लीप किट’ बनवून ते विकण्यास सुरुवात केली. एवढ्या लहान वयात आपल्या कल्पकतेचा जोरावर बिलिओनियर बनणारी ती फक्त पहिली महिलाच नसून पुरुषांनाही पाठीमागे टाकणारी पहिली व्यक्ती ठरणार आहे. सतत कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असणारी कायली जेनर पुन्हा एकदा चर्चेत आली ते तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे(Kylie Jenner’s Lion-Head Outfit Stuns at Schiaparelli Show).
कायली जेनरचा सिंहाचा ड्रेस चर्चेत
पॅरिस फॅशन वीकमध्ये किम कार्दशियनची बहिण आणि अमेरिकन सुपरमॉडेल कायली जेनरने तिच्या हटके ड्रेसमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कायलीने तिच्या सोशल मीडियावर या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. Paris Couture Week साठी, कायलीने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता, ज्यामध्ये फॉक्स ३डी (3D) सिंहाचे डोके जोडलेले होते. शोमध्ये प्रवेश करताच सर्वांच्याच नजरा कायली आणि तिने परिधान केलेल्या सिंहाच्या ड्रेसवर होत्या. तिचा हा ड्रेस बनवण्यासाठी वेलव्हेटचे कापड वापरण्यात आले होते. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. कायलीच्या या ड्रेसला ३डी (3D) प्रकारचा सिंहाचा मास्क लावण्यात आला होता. हा ड्रेस फॅशन डिझायनर डॅनियल रोझबेरीने Daniel Roseberry डिझाइन केला होता. फोम, कापूस, लोकर, सिल्क फर यांचा वापर करून हा ड्रेस तयार केला होता. हा ड्रेस तयार करताना कोणत्याही प्राण्याला इजा करून किंवा प्राण्यांच्या केसांचा वापर करून तयार केलेला नाही. याबाबत डिझायनरने स्पष्टीकरण दिले आहे. या संपूर्ण ड्रेसला लहान - लहान घडी असल्यासारखे भासत आहे. ड्रेसच्या या टाईपने ड्रेसला नवा लुक मिळाला होता.
हेअरस्टाईल आणि मेकअपने दिला ग्लॅमरस टच
यावेळी कायलीने गोल्डन रंगांच्या हिल्स सोबतच कानात गोल्डन रंगांचे कानातले परिधान केले होते. या लुकला पुर्ण करण्यासाठी कायलीने तिचे केस वर टाय केले होते. या बन हेअरस्टाईलमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने आयशॅडो, विंग्ड आयलाइनर आणि मस्करा लावून तिचा लुक पूर्ण केला होता.