Lokmat Sakhi >Social Viral > आईची साडी, नथ आणि स्वप्नसोबत घेऊन छाया कदम जेव्हा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला जाते..

आईची साडी, नथ आणि स्वप्नसोबत घेऊन छाया कदम जेव्हा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला जाते..

Laapataa Ladies Actor Chhaya Kadam Makes Cannes Debut In Late Mother's Saree And Nath : कान्सच्या रेड कार्पेटवर पोहचेपर्यंतचा संघर्ष आणि सोबत आई नसल्याची जाणीवही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2024 01:53 PM2024-05-21T13:53:15+5:302024-05-21T13:54:34+5:30

Laapataa Ladies Actor Chhaya Kadam Makes Cannes Debut In Late Mother's Saree And Nath : कान्सच्या रेड कार्पेटवर पोहचेपर्यंतचा संघर्ष आणि सोबत आई नसल्याची जाणीवही..

Laapataa Ladies Actor Chhaya Kadam Makes Cannes Debut In Late Mother's Saree And Nath | आईची साडी, नथ आणि स्वप्नसोबत घेऊन छाया कदम जेव्हा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला जाते..

आईची साडी, नथ आणि स्वप्नसोबत घेऊन छाया कदम जेव्हा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलला जाते..

'आई असते जन्माची शिदोरी सरतही नाही उरतही नाही!' आईच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला पदोपदी होते (Chhaya Kadam). आई म्हणजे सर्वस्व. आईचे देखील काही स्वप्ने असतात, ते पूर्ण करण्यासाठी आपण धडपड करीत असतो. पण स्वप्न पूर्ण करताना किंवा लेकराचं यश पाहण्यासाठी, आईच सोबत नसली तर...? आणि याच गोष्टीमुळे अभिनेत्री छाया कदम भावूक झाल्या आहेत (Cannes Debut).

नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री छाया कदम पोहोचल्या. यावेळी त्या एकट्या नसून, त्यांच्यासोबत आईची साडी, आईची नथ, आईची आठवण आणि आईचं स्वप्न देखील होतं. छाया कदमांनी या खास प्रसंगी आईची साडी नेसली होती. आईला विमानातून फिरवण्याचं स्वप्न अधुरं राहिलं असल्याचं म्हणत त्यांनी खंत देखील व्यक्ती केली आहे(Laapataa Ladies Actor Chhaya Kadam Makes Cannes Debut In Late Mother's Saree And Nath).

आईबाबा, आपले मूल वाया जाऊ नये अशी भीती वाटते? घरात वेळीच करा ५ गोष्टी..

आईची साडी, नथ आणि गजरा..आईच्या आठवणीत..

फ्रँडी', 'सैराट' आणि आता लापता लेडीज या सुपरहिट सिनेमात छायाच्या अभिनयाची विशेष चर्चा झाली. त्यांना कान्समध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे यावेळी त्या एकट्या नसून, त्यांच्यासोबत आईच्या साडीतली उब, आईची नथ, प्रेम आणि आईचं अधुरं स्वप्न सोबत होतं. या विषयी त्यांनी सोशल मिडीयावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.

ऐन तारुण्यात हाडं कडकड वाजतात? कॅल्शियम शरीराला आवश्यक? हाडांची झीज होऊ नये म्हणून...

कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं की, ''आई तुला विमानातून फिरवण्याचे माझे स्वप्न अधुरे राहिले....पण आज तुझी साडी आणि नथ मी विमानातून कान्स फिल्म फेस्टीव्हलपर्यंत घेऊन आले, याचे समाधान आहे. तरी आई ! आज तू हवी होतीस. हे सगळं पाहण्यासाठी. लव्ह यु मम्मुडी आणि खूप खूप मिस यू".

दरम्यान, पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी छाया कदम ७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या. अलिकडेच त्या 'लापता लेडीज'मध्ये छाया कदम 'मंजू माई'च्या भूमिकेत झळकल्या. इतकंच नाही तर 'मडगाव एक्सप्रेस' या हिंदी सिनेमामध्येही त्यांन महत्त्वाची भूमिका साकारली होती.

Web Title: Laapataa Ladies Actor Chhaya Kadam Makes Cannes Debut In Late Mother's Saree And Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.