लडाखमधील एका तरुणीने तिच्या शाळेत शानदार फलंदाजी केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या तरुणीची बरीच चर्चा सुरू झाली. लडाखमधील शालेय शिक्षण संचालनालयाने (DSE) शुक्रवारी ही क्लिप ट्विटरवर शेअर केली. कॅप्शनमध्ये, डीएसईने मुलीची ओळख मकसूमा म्हणून केली असून सहावीची विद्यार्थिनी आहे. शालेय शिक्षण संचालनालयाने ट्विट करून मुलीने स्वतःबद्दल काय सांगितले. त्यानंतर ती म्हणाली, 'माझे वडील घरी आहेत आणि शाळेतील माझे शिक्षक मला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात.' (Ladakh girl aspires to be like virat kohli teacher help like this)
My father at home and my teacher at school encourage me to play cricket. I'll put all my efforts to play like @imVkohli Maqsooma student class 6th #HSKaksarpic.twitter.com/2ULB4yAyBt
— DSE, Ladakh (@dse_ladakh) October 14, 2022
ही मुलगी भारतीय क्रिकेट संघाचा रन मशीन क्रिकेटर विराट कोहलीची फॅन आहे आणि ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिचा खेळ दिसून येतो. डीएसईने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलगी पुढे म्हणाली, 'विराट कोहलीप्रमाणे खेळण्यासाठी मी माझे सर्व प्रयत्न करेन.' ट्विटमध्ये सांगण्यात आले आहे की, मकसुमा सहावीत शिकणारी विद्यार्थिनी आहे, विद्यार्थीनी बोर्डवर धावा काढण्यासाठी शार्प शॉट्स मारण्याचा प्रयत्न करते आणि नंतर धावते. एकेकाळी ती शाळेच्या मैदानाबाहेर बॉल मारतानाही दिसली होती अशा चर्चा आहेत.
वडीलांना नोकरी लागताच पोरीनं आनंदाच्या भरात असं काही केलं; दृश्य पाहून डोळे पाणावतील
क्लिपमध्ये, मकसूमाने सांगितले की, तिला भारतीय स्टार फलंदाज विराट कोहलीसारखे बनण्याची इच्छा आहे. एमएस धोनीने प्रसिद्ध केलेला 'हेलिकॉप्टर शॉट' तिला शिकायचा आहे, असेही तिने सांगितले. ती म्हणाली, 'मी लहानपणापासून खेळतेय. मी अजूनही 'हेलिकॉप्टर शॉट' कसे खेळायचे ते शिकत आहे. माझा आवडता क्रिकेटर विराट कोहली आहे आणि मला त्याच्यासारखे व्हायचे आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि 1,200 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कमेंट बॉक्समध्ये इंटरनेट वापरकर्त्यांनी शाळकरी मुलीचे कौतुक केले आणि तिच्या खेळावरील प्रेमाबद्दल तिचे कौतुक केले