आपण सार्वजनिक वाहनाने प्रवास करतोय आणि अचानक काही घडले तर आपण हडबडून जातो. वेगळ्याच पद्धतीचे कपडे घातलेले लोक आत घुसतात आणि आपल्याला धाक दाखवत आपल्याकडचे पैसे किंवा किमती गोष्टी मागायला सुरूवात करतात. हे चित्र काही वेळा आपण चित्रपटात पाहतो. एखादवेळी अशा घटना घडल्याचे आपल्या ऐकीवातही असते. मात्र प्रत्यक्षात असे घडले तर काय याचा मात्र आपल्याला अंदाज नसतो. मत्र अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये नुकतीच एक आगळीवेगळी घटना समोर आली आहे. भारतात मेट्रोमध्ये महिलांनी डान्स केला, गरबा नृत्य केले किंवा आणखी काही केले असे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण न्यूयॉर्कमधील मेट्रोमध्ये हा दंगा पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाह (ladies Gang in Green Jumpsuits Robbery in New York Metro).
लूट करणारी महिलांची एक गँग मेट्रो स्टेशनमध्ये घुसली आणि त्यांनी मेट्रोमध्ये उपस्थित महिलांना लुटायला सुरूवात केली. इतकेच नाही तर या गँगमधील महिला निऑन रंगाचे जंपसूट घालून आल्या होत्या. अमेरीकेतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रोमध्ये हिरव्या रंगाचे ड्रेस घातलेल्या महिलांची गँग हंगामा करत घुसली. सुरुवातीला हे कोण आहेत याबाबत लोकांना काहीच समजले नाही, कारण त्यांनी भन्नाट जंपसूट घातला होता. गँगमधील ६ महिला प्रवाशांसोबत हाणामारी करायला लागल्या. या गँगमधील महिलांनी एका महिलेला मारायला सुरुवात केली तेव्हा मेट्रोमध्ये एकच गोंधळ माजला. इतकेच नाही तर दुसऱ्या एका प्रवाशालाही चेहऱ्यावर बुक्के मारण्यास सुरुवात केली.
या महिला गँगने १९ वर्षाच्या २ महिला प्रवाशांवर हल्ला केल्याचे मिडीया रिपोर्टसमध्ये म्हणण्यात आले आहे. यानंतर गँगमधील महिला लगेचच फरार झाल्या. या महिलांनी मुलींकडे असलेले मोबाईल, क्रेडीट कार्ड, पर्स आणि इतर सामान चोरले. याबाबत एका महिलेने सांगितले की आपली मुलगी आणि तिची मैत्रीण यांना यामध्ये त्रास झाला असून आता पोलिस या विषयात लक्ष घालत आहेत. या घटनेचा व्हिडिओ रेडीट या सोशल मीडिया हँडलवर पोस्ट करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे. अवघ्या १५ सेकंदांचा हा व्हिडिओ हजारो जणांनी पाहिला असून जवळपास ५०० जणांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.