नोकरीसाठीमुलाखत देणे आणि त्यात आपली निवड न होणे ही वाटायला अगदी सामान्य गोष्ट. कंपनीला जी कौशल्ये अपेक्षित आहेत ती कौशल्ये आपल्याकडे नसतील किंवा आपल्याला हवा असलेला पगार कंपनी देऊ शकत नसेल तर आपली अशा ठिकाणी निवड होणार नाही हे आपल्याला कळून चुकते. आता एखाद्या ठिकाणी आपली निवड होणार नाही हे लक्षात आल्यावर आपल्याला त्याठिकाणी नोकरी करायची इच्छा असेल तरी त्याचा काहीच उपयोग होत नाही. एकदा आपल्याला एखाद्या कंपनीने रिजेक्ट केले की पुन्हा आपण त्या कंपनीकडे ढुंकूनही बघत नाही. (Viral Photo) मात्र काही लोक रिजेक्ट झाल्यावरही पुन्हा चांगली तयारी करतात आणि त्याच कंपनीत मुलाखतीसाठी जातात. मात्र अमेरिकेतील एका महिलेने पहिल्याच राऊंडमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर असे काही केले की त्या कंपनीने या महिलेला पुन्हा मुलाखतीसाठी बोलवले (American Lady Hilarious Response to Job Rejection).
अमेरिकेत असलेल्या कंपनीने या महिलेला १४ जुलै रोजी तिची कंपनीत निवड झाली नसल्याचे मेलद्वारे कळवले. त्यावेळी या महिलेने थँक यू किंवा फाईन असा रिप्लाय करणे आवश्यक होते. मात्र तिने या मेलला ‘Y Tho’ चे मीम पाठवत रिप्लाय केला. Y Tho म्हणजेच Why Though म्हणजे असे का? असा प्रश्न एकप्रकारे या महिलेने संबंधित कंपनीला विचारला. आता आपण रिजेक्ट झालो म्हटल्यावर कंपनी आपण केलेला रिप्लाय कशाला पाहिल असे या महिलेला वाटले खरे. पण तिचा हा रिप्लाय पाहून तिला पुन्हा याच कंपनीत मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. या महिलेने कंपनीला दिलेला रिप्लाय सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.
आता अशाप्रकारचे मीम पाठवले असूनही या महिलेला त्याच कंपनीतून पुन्हा मुलाखतीसाठी बोलवण्यात आले. आता रिजेक्ट झाल्यावर पुन्हा कसे बोलावले असा प्रश्न या महिलेला विचारण्यात आला. तेव्हा “अशाप्रकारचे मीम पाठवणारी महिला नेमकी आहे तरी कोण हे पाहण्यासाठी आपल्याला कंपनीने पुन्हा बोलावले असावे” अशी प्रतिक्रिया या महिलेने माध्यमांशी बोलताना दिली. या कंपननीत नोकरी न मिळाल्याने मी काहीशी नाराज होते. पण मी केलेली एक गोष्ट इतकी वेगाने सगळीकडे पसरली आणि त्यामुळे मला प्रसिद्धी मिळाली, म्हणून मी आता खूश आहे अशी भावनाही या महिलेने व्यक्त केली.