नदीत उडी मारणं सोपं काम नाही. ज्यांना याचा सराव असतो त्यांना याचं काहीच वाटतं नाही. पण ७० वर्षांच्या आजींनी नदीत उडी मारल्याचं सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या वृद्ध महिलेचे वय ७० वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. (Viral video of old lady jumping in ganga river trending reactions over video on internet)
जिथं लोक तरुणपणात दौऱ्यात आणि प्रवासात आळस करतात, तिथे वयाच्या ७० व्या वर्षी आजींनी कशाचीही पर्वा न करता नदीत उडी घेतली. हर की पौड़ी पुलावरून या आजींनी गंगा नदीत उडी घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर आजी किनाऱ्यापर्यंत आरामात पोहताना दिसत आहेत. यांचे धाडस खरोखरच कौतुकास पात्र आहे.
पाऊस सुरू झाला अन् जोडपं रिक्षात जाऊन बसलं; नंतर जे झालं ते पाहून पोट धरून हसाल
हा व्हिडिओ पाहून सगळेचजण आजींचे चाहते झाले आहेत. जे लोक स्वप्न पूर्ण करण्यात आळशीपणा दाखवतात त्यांना वृद्ध आजींनी खूप काही शिकवले आहे. या व्हिडिओने लोकांचे जेवढे मनोरंजन केले आहे तेवढेच आश्चर्यचकीतही केले आहे. या वयात असे साहस करताना पाहिल्यावर लोकांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता.
शाब्बास पोरी! डोंगरावर अभ्यास करणाऱ्या शाळकरी मुलीला पाहून आनंद महिंद्रा म्हणाले....
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. काही तासांतच नऊ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. अवघ्या 24 सेकंदांच्या या व्हिडिओने आजीला खूप प्रसिद्धी मिळवून दिली आहे. कौतुकास्पद कमेंट्सचा वर्षाव या व्हिडिओवर केला जात आहे.