Join us  

Lata Mangeshkar : मेकअप आर्टिस्टची लता मंगेशकरांना अनोखी श्रद्धांजली; ५ मिनिटांत चेहऱ्यावर हूबेहुब साकारल्या लता दीदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 12:32 PM

Lata Mangeshkar : हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्काच बसेल. लता दीदी पुन्हा एकदा आपल्यात हजर झाल्याचं तुम्हाला जाणवेल.

नुकतचं देशातील महान गायिका लता मंगेशकर यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले. ही बातमी कळताच लोक भावूक झाले. प्रत्येकाने आपापल्या परीने गान सम्राज्ञींना आदरांजली वाहिली. सोशल मीडियावर अनेकांनी व्हिडिओ आणि फोटोंच्या माध्यमातून लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान, एका मेकअप आर्टिस्टचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. (Makeup artist paid tribute to lata mangeshkar in a different way see viral video)

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल. लता दीदी पुन्हा एकदा आपल्यात हजर झाल्याचं तुम्हाला जाणवेल.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी दिसत आहे, काही वेळातच ती लता मंगेशकर बनते. खरं तर ही मुलगी एक मेकअप आर्टिस्ट आहे, जी कलेतून कोणताही फॉर्म घेते. लता मंगेशकर यांना आपल्या कलेतून आदरांजली वाहिली.

हा व्हिडिओ @stuck.in.a.paradise नावाच्या इंस्टाग्राम यूजरने त्याच्या अकाउंटवर शेअर केला आहे, जो खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स पूर्णपणे हैराण झाले आहेत. एका युजरवर कमेंट करताना लिहिले खरोखर छान व्हिडिओ. त्याचवेळी, आणखी एका युजरने लिहिले आहे - तुम्ही एक अप्रतिम मेकअप आर्टिस्ट आहात.   काहींना चित्रांच्या माध्यमातून काही वाळू शिल्प साकारून लता दीदींविषयीचे प्रेम व्यक्त केले आहे. 

टॅग्स :लता मंगेशकरसोशल मीडियासोशल व्हायरल