लेफ्टनंट रिग्झिन चोरोल (Rigzin Chorol) या त्यांचे दिवंगत पती रायफलमॅन रिग्झिन खंडप यांचे स्वप्न पूर्ण करून भारतीय सैन्यात अधिकारी झाल्या आहेत. (Indian Army) यासाठी त्यांनी ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमीमध्ये 11 महिन्यांचे कठोर प्रशिक्षण घेतले, त्यानंतर आपले ध्येय पूर्ण करू शकल्या. यादरम्यान, समारंभात आपल्या मुलाला खूप दिवसांनी पाहिल्यानंतर त्या खूप आनंदी दिसत होत्या. त्याच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून त्यांच्या आनंदाचा अंदाज येतो. यादरम्यान लेफ्टनंट रिग्झिन चोरोल याचे श्रेय त्यांचे दिवंगत पती रिग्झिन खंडप यांना देताना दिसल्या. ( Late husband dream wife became army officer to fulfill the dream of late husband army officer rigzin chorol)
एका कार्यक्रमात आपल्या मुलाला कुशीत घेऊन लेफ्टनंट रिग्झिन चोरोल यांनी सांगितले की, ''मी माझ्या पतीचं स्वप्न पूर्ण केलं त्यांची इच्छा होती की मी सेना अधिकारी बनावं. माझा हा प्रवास डिसेंबर २०२१ मध्ये सुरू झाला. जेव्हा मी ओटीएमध्ये सहभागी झाले. ११ महिन्यांच्या कंठोर ट्रेनिंगसाठी मी एकुतल्या एक लेकापासून लांब राहिले. मला विश्वास आहे माझ्या दिवंगत पतीला माझ्यावर गर्व असेल.'' दरम्यान दिवंगत खांडप हे लडाख स्काऊट्सच्या जेडां सुंपा बटालियनमध्ये रायफलमॅन होते. त्यांनी कर्तव्यादरम्यान आपला जीव गमवला.
मालकाला बघताच बकऱ्यांनी केली बेशुद्ध पडण्याची एक्टिंग; व्हिडिओ पाहून पोट धरून हसाल
त्याचप्रमाणे कॅडेट हरवीन कौर काहलॉन यांनीही त्यांचे पती मेजर केपीएस काहलॉन यांच्या पावलावर पाऊल टाकले. 11 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर त्या भारतीय लष्करात अधिकारी म्हणून नियुक्त झाल्या. कॅडेट हरवीन कौर काहलॉन सांगतात, ''माझ्या पतीने सैन्यात भरती होण्यासाठी माझा उत्साह वाढवला. मला त्याचे स्वप्न साकार करायचे होते.'' जेव्हा त्यांचे पती कॅप्टन कंवलपाल सिंह काहलॉन दिवंगत झाले, त्या काळात हरवीन कौर काहलॉन जालंधरमधील एका खाजगी शाळेत शिक्षिका होत्या.