Join us  

कपडे ड्रायरमध्ये खूप वेळ राहिल्याने चुरगळले? बर्फाचा करा खास वापर, आढ्या होतील गायब 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2023 6:37 PM

कपडे धुण्यासाठी जे वॉशिंग मशिनचा वापर करतात, त्यांना हा अनुभव बऱ्याचदा येतो. त्यासाठीच बघा नेमका काय उपाय करायचा...(Hacks for wrinkle free clothes)

ठळक मुद्देहा प्रयोग प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरतो, हे तो करून बघितल्यावरच लक्षात येईल. जर मशिनमध्ये ८ ते १० कपडे असतील तर साधारण ५ ते ६ आईस क्यूब वापरावे.

हल्ली बऱ्याचजणी रोजचे कपडे धुण्यासाठी किंवा मग चादरी, उशांचे कव्हर, बेडशीट असे जड कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनचा वापर करतात. मशिनमध्ये टाकलेले कपडे जर ड्राय होऊन लगेच वाळत टाकले तर ठीक. पण ते कपडे जर ड्रायरमध्ये तसेच काही तास राहिले, तर मात्र कपड्यांवर सुरकुत्या पडतात ( wrinkles on clothes). कपडे खूपच जास्त चुरगळतात (Hacks for wrinkle free clothes). शिवाय ओलसर कपड्यांचा एक वेगळाच कुबट वास येऊ लागतो. असं होऊ नये, म्हणून बर्फाचा एका खास पद्धतीने वापर करून बघा.

ऑटोमॅटिक मशिनसाठी हा उपाय चांगला आहे. पण ज्यांचे मशिन सेमी ऑटोमॅटीक या प्रकारातले आहेत, ते देखील हा प्रयोग करून बघू शकतात. हा उपाय इन्स्टाग्रामच्या glam.homedesign या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

चहा गाळल्यानंतर उरलेली चहा पावडर टाकून देऊ नका, भांडी स्वच्छ करण्यासाठी करा खास उपयोग

हा प्रयोग प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरतो, हे तो करून बघितल्यावरच लक्षात येईल. जर मशिनमध्ये ८ ते १० कपडे असतील तर साधारण ५ ते ६ आईस क्यूब वापरावे.

 

कसा करायचा उपाय?१. हा उपाय करण्यासाठी बर्फाचे तुकडे ड्रायरमध्ये टाका आणि काही मिनिटांसाठी ड्रायर पुन्हा फिरवा. बर्फाच्या थंडपणामुळे कपड्यांवरच्या आढ्या निघून जातील आणि चुरगळलेले कपडे सरळ होण्यासाठी मदत होईल.

कपड्यांवर शाईचे डाग पडले? ३ सोपे उपाय, कमी मेहनतीत डाग होतील स्वच्छ, निघतील झटपट

२. काही जणांनी या उपायाच्या कमेंटमध्ये असंही लिहिलं आहे की बर्फाचा वापर करण्याऐवजी टॉवेलसारखा एखादा जाडसर कपडा थंड पाण्यात बुडवा आणि तो ड्रायरमध्ये टाकून ते पुन्हा काही मिनिटांसाठी फिरवा.

प्रेग्नन्सीच्या सुरुवातीला त्रास झालाच, पण कोणाला सांगू शकले नाही, कारण.... आलिया भट सांगतेय...

३. कपडे ड्रायरमध्ये अधिककाळ राहिल्याने त्यांचा कुबट वासही येतो. त्यामुळे तो वास घालविण्यासाठी बर्फाच्या तुकड्यांवर एखादं परफ्यूम मारा आणि मग ते ड्रायरमध्ये टाका. वास कमी होण्यास मदत होईल, असंही काही जणांनी सुचवलं आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरललाइफस्टाइलहोम रेमेडी