लिंबाचे भाव सध्या गगनाला भिडले आहेत. सगळ्यांच्याच घरात लिंबाचा वापर कमी झालाय. इतके महागडे लिंबू वापरल्यानंतर फेकून देण्यापेक्षा त्याच्या सालीचा वापर करून तुम्ही घरातील अनेक कामं सोपी करू शकता. यासाठी तुम्हाला फार काही करावं लागणार नाही. फक्त वापरेल्या लिंबाच्या सालींचा योग्य वापर करता यायला हवा. (Different uses of lemon peel in bathroom)
या लेखात लिंबाच्या सालीच्या काही उत्तम उपयोगांबद्दल सांगणार आहोत. लिंबाच्या सालीने बाथरूमची अनेक अवघड कामे काही मिनिटांत सोपी करू शकता. याच्या मदतीने तुम्ही बाथरूम देखील स्वच्छ करू शकता आणि जास्त पैसे खर्च करण्यापासून देखील वाचू शकता. लिंबाच्या सालीचे काही सोपे हॅक्स आणि टिप्स. (Lemon Peel Uses For Cleaning)
1) बाथरूम सिंकची सफाई करणं
बाथरूम सिंकवर कधी कधी साबण, टूथपेस्ट इत्यादींवर डाग पडतात जे काढणे फार कठीण असते. अशा स्थितीत तुम्ही बाथरूमचे सिंक साफ करण्यासाठी लिंबाच्या सालीचाही वापर करू शकता. यासाठी सिंकवर रसाचा भाग १५ मिनिटे चांगले घासून घ्या. ५ मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे सिंक अगदी चमकदार दिसेल.
2) किटक लांब राहतात
नाल्यातून येणाऱ्या कीटकांमुळे तुम्हालाही त्रास होत असेल, तर ती समस्या दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर सहज करू शकता. यासाठी एक लिटर पाण्यात 5-7 लिंबाची साले टाकून ती चांगली उकळावीत आणि काही वेळाने उकळलेले पाणी खड्ड्याच्या व आजूबाजूच्या ठिकाणी तीन ते चार दिवस टाकून स्वच्छ करावे. लिंबाच्या तीव्र वासामुळे, नाल्याच्या आतून किडे येणार नाहीत.
3) गंज काढून टाकण्यासाठी
बाथरूमधील नळ किंवा शॉवर हेड. जर या दोन्ही किंवा बाथरूमच्या इतर वस्तू गंजल्या असतील, तर तो गंज काढण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा सहज वापर करू शकता. यासाठी सर्व प्रथम गंजलेल्या जागेवर एक ते दोन चिमूटभर मीठ टाकून चांगले पसरवा किंवा शिंपडा. काही वेळाने, गंजलेल्या भागाला रसाच्या बाजूने 4-5 मिनिटे घासून घ्या. यामुळे गंज सहज निघून जाईल.
प्रोटिन, कॅल्शियमसाठी नॉनव्हेज कशाला हवं? भरभरून प्रोटीन देतील रोजच्या जेवणातील १० व्हेज पदार्थ
टाईल्सची स्वच्छता
टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही लिंबाच्या सालीचा वापर करू शकता. याच्या वापराने टाईल्सवरील डागही बाहेर येतील आणि बाथरूमही फ्रेश राहिल.
१) यासाठी प्रथम 4-5 लिंबांची सालं एक लिटर पाण्यात टाकून चांगली उकळा.
२) आता त्यात दोन चमचे बेकिंग सोडा टाका आणि नीट मिक्स करा आणि पाणी थंड होण्यासाठी सोडा.
३) यानंतर, मिश्रण टाईल्सवर चांगले स्प्रे करा आणि काही वेळ ते सोडा.
४) काही वेळानंतर, क्लिनिंग ब्रश किंवा स्क्रबने स्वच्छ करा.
बाथरूमच्या फरशा साफ करणे आणि गंज इत्यादी काढून टाकण्याव्यतिरिक्त, लिंबाची सालं अनेक कामांसाठी वापरली जाऊ शकतात. लिंबाच्या सालींचा वापर भिंतीवरील किंवा आरशावरील कठीण पाण्याच्या खुणा काढून टाकण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.