Join us  

Lemon Price Hike Memes : लिंबाचा भाव ऐकूनच दात आंबट झाले! लिंबू महागताच सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 5:30 PM

Lemon Price Hike Memes : किमतीत वाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर नेटिझन्सनी विनोदी मीम्स शेअर केले आहेत.

(Image Credit- mumbai-magic.blogspot.com)

उन्हाळा सुरू झाला असून दिवसेंदिवस गरमीचं वातावरण जास्तच वाढतंय. हा तुमचे मन आणि शरीर थंड करणाऱ्या ताजेतवाने पेयांचा आनंद घेण्याचा हंगाम आहे. जेव्हा जेव्हा आपण फ्रेश ड्रिंक बद्दल बोलतो तेव्हा लिंबू लगेच डोळ्यासमोर येतात. लिंबू पाणी, लिंबू सोडा, मोहितो असे अनेक पेयपदार्थ उन्हाळ्यात तहान भागवतात आणि फ्रेश फिल करून देतात. (lemon price hike memes and jokes are trending online best ones)

या आठवड्याच्या सुरुवातीला फळांच्या किमती अनेक पटीने वाढल्या. राष्ट्रीय राजधानीतील सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या आझादपूर मंडीमध्ये 70 ते 90 रुपये प्रति किलो दराने विकले जात आहे.

शिवाय, गुजरातमध्ये 240 रुपये प्रति किलो आणि कर्नाटकमध्ये 160 रुपये प्रति किलोपर्यंत असे भाव गगनाला भिडले. खरेतर, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये एक उत्तम दर्जाचा लिंबू 15 रुपये प्रति नग विकला जात  आहे, असे अहवालात म्हटले आहे.

किमतीत वाढ झाल्याची घोषणा झाल्यानंतर ट्विटर युजर्सनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली. मायक्रोब्लॉगिंग साइट्सवर नेटिझन्सनी विनोदी मीम्स शेअर केले आहेत.

तर इतरांनी विनोदी पोस्ट केल्या आहेत ते पाहून तुम्हाला हसू आवरलं जाणार नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया