सखी, सय्या तो खूब ही कमात है, महंगाई डायन खाए जात है.. हे गाणं एकेकाळी किती गाजलं. लोकप्रिय झालं. महागाईचे चटके सगळ्यांनाच बसतात पण तरी महागाई वाढली तरी खर्च कमी होत नाही, फक्त खिसा जास्तच फाटत जातो. आताही तेच झालं आधी कोरोना मग महागाई, आता तर लिंबूही इतके महाग झाले की ऐन उन्हाळ्यात कुणी घरी आलं तर त्याला लिंबू पाणी विचारण्याची सोय नाही की बाहेर गाड्यांवरचं लिंबू पाणी प्यायचं म्हंटलं तरी घाम फुटावा. लिंबू देशात सर्वत्रच इतके महाग झाले की त्याने उन्हाचे चटके वाढवले. मात्र परिस्थिती कितीही अवघड असली तरी लोक हसून निभावतात, त्यावरही जोक्स, मिम फिरतात, आपल्या मानसिकतेतले विरोधाभास आणि जगण्यातले लोभ विनोदी पद्धतीने दाखवत सारे घटकाभर आपल्यावर, आपल्या परिस्थितीवरही हसून घेतात.
(Image : Google)
तसंच काहीसं या व्हिडिओतही घडलं आहे.
लग्नाला गेलेला एकजण तिथं टोपात ठेवलेले लिंबू पाहून इतका हरखून जातो की टिश्यूपेपरमध्ये लिंबाच्या फोडी घेऊनच पळ काढतो..
हा व्हिडिओ जरी कॉमेडी आणि लिंबाच्या महागाईवर भाष्य करणारा असला तरी अनेकांना तो प्रचंड आवडला आहे. शशांक उडाखे या कंटेट क्रिएटरने तयार केलेला हा व्हिडिओ.तो इन्स्टा रिल्स आणि युट्यूब व्हिडिओ करतो, ते गाजतातही खूप. त्याचा हा लिंबाचा व्हिडिओही खूप गाजला आहे. त्या व्हिडिओसह कॅप्शन आहे, लिंबू अब सोने के दुकानपे मिलेगा..
तो व्हिडिओ ४२ लाख लोकांनी पाहिला आणि अनेकांनी कमेण्टही केल्या की या लिंबाचं करायचं काय?
हे रिल म्हणतं की लाजू नका, व्हेन लाइफ गिव्हज यू लेमन, टेक इट.
अनेक युजर्सनेही आपली मतं लिहिली आहेत.. साऱ्यांचं मात्र एकच मत..
हा रे महंगाई..
लोकांनी हसून घेतलं क्षणभर आपल्याच परिस्थितीवर, आता लिंबही महाग झाली तर जगण्याचे चटके हसूनच सहन करणं भाग आहे.