Join us  

बापरे! पर्यटकांच्या गाडीत थेट शिरली सिंहींण, आणि मग....पाहा व्हायरल व्हिडिओ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2022 12:46 PM

Lioness Attack on Tourist Safari Viral Video : हा प्रसंग पाहून कदाचित आपल्या अंगावर काटा उभा राहू शकतो. तेव्हा या पर्यटकांची काय अवस्था झाली असेल ते वेगळे सांगायला नको.

ठळक मुद्देजवळपास ६ लाख नेटीझन्सनी अवघ्या ७ दिवसांत हा व्हिडिओ पाहिला आहे. गाडीत बसलेल्या या पर्यटकांचे नेमके काय झाले असेल हे शब्दांत सांगणे कठिण आहे.

वाघ, बिबट्या, सिंह यांसारखे प्राणी आपण चित्रात किंवा टीव्हीवर पाहतो. हे प्राणी जंगली असल्याने आपल्या मनात त्यांच्याविषयी लहानपणापासूनच काहीशी भिती असते. एखादवेळी बिबट्या किंवा वाघ मानवी वस्तीत आला अशी बातमी आली तरी आपले धाबे दणाणते. मग या प्राण्यांना पाहण्यासाठी कधीतरी आपण प्राणी संग्रहालयात किंवा जंगल सफारीला जातो. मात्र अशावेळीही आपण या प्राण्यांना पाहतो. नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामध्ये एक सिंहीण चक्क पर्यटकांच्या गाडीत शिरताना दिसते. हा प्रसंग पाहून कदाचित आपल्या अंगावर काटा उभा राहू शकतो. तेव्हा या पर्यटकांची काय अवस्था झाली असेल ते वेगळे सांगायला नको (Lioness Attack on Tourist Safari Viral Video). 

जंगल सफारी हा जितका उत्तम अनुभव असतो, तितकाच तो काही वेळा थरारकही असू शकतो. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पर्यटकांनी भरलेली एक गाडी जंगलातून जात असताना एचानक एक सिंहीण जोरात धावत येते आणि या गाडीत चढते. आता अशाप्रकारे सिंहीण गाडीत चढल्यावर त्यातील पर्यटकांची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पना करुन शकतो. मात्र हे सगळे जण आपली भिती न दाखवता तिला अतिशय प्रेमाने कुरवाळतात. कुत्री किंवा इतर प्राणीही जवळ येऊन ज्याप्रमाणे आपला वास घेतात किंवा आपल्याला चाटतात त्याचप्रमाणे ही सिंहीण गाडीत बसलेल्या प्रत्येक पर्यटकाला चाटते. हे पर्यटकही विशेष न घाबरता तिच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवताना दिसतात. 

अवघ्या १८ सेकंदांचा हा व्हिडिओ ट्विटरवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडिओला १.५ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले असून जवळपास ६ लाख नेटीझन्सनी अवघ्या ७ दिवसांत हा व्हिडिओ पाहिला आहे. हजारो जणांनी हा व्हिडिओ रिट्विट केला असून बऱ्याच जणांनी त्यावर प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. हा व्हिडिओ नेमका कोणत्या देशातला, कोणत्या जंगलातला आहे याबाबत मात्र पुरेशी माहिती मिळू शकलेली नाही. New Wildlife Experience अशी कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आली असून हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया