Join us  

..मी कित्ती वाट पाहिली! दादा होणार हे कळल्यावर पहा छोटुशा मुलानं काय केलं... व्हिडिओ व्हायरल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 3:10 PM

Emotional Video Of a Little Boy: "याच क्षणाची मी वाट बघत होतो..." आई प्रेग्नंट आहे, हे समजल्यानंतर त्या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हावभाव इतके झरझर बदलत गेले की ते पाहूनच नेटीझन्स इमोशनल झाले. 

ठळक मुद्देआपल्या लेकाला या गोष्टीचा इतका आनंद होऊ शकतो आणि तो अशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रीया देऊ शकतो, असा विचार कदाचित त्याच्या आई- वडिलांनी केलाही नसेल. 

लहान मुलांचे काही अतिशय गोड आणि निरागस भावभावना असणारे व्हिडिओ सोशल मिडियावर नेहमीच व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ खरोखरच इतके छान आणि आपल्याला इतके गुंतवून ठेवणारे असतात की ते पाहूनच आपणही त्यांच्या निरागस विश्वात नकळत हरवून जातो. सध्या असाच एका लहान मुलाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. आपण आपल्या मुलाला (little boy) जे काही सरप्राईज (surprize by his mother) देत आहोत, ते पाहून आपल्या लेकाला या गोष्टीचा इतका आनंद होऊ शकतो आणि तो अशा पद्धतीने त्यावर प्रतिक्रीया देऊ शकतो, असा विचार कदाचित त्याच्या आई- वडिलांनी केलाही नसेल. 

 

majicallynews या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये जो मुलगा दिसतो आहे तो साधारण ८ ते ९ वर्षांचा आहे.

केस सारखे चिपचिपीत होतात? सोपा घरगुती उपाय, केस होतील शायनी- सिल्की

या मुलाला त्याच्या आई- वडिलांनी एक खूपच खास सरप्राईज दिलं आहे. एक खूप छान गिफ्ट बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये त्याच्या पालकांनी त्यांना होणाऱ्या दुसऱ्या बाळाच्या सोनोग्राफीची एक इमेज ठेवली आहे. हा मुलगा जेव्हा तो बॉक्स उघडतो, तेव्हा आतली बाळाची अल्ट्रासाउंड इमेज पाहून एकदमच हरखून जातो. त्याला परिस्थितीचा अंदाज येतो, आणि तु प्रेग्नंट आहेस का, मला आता सिब्लिंग होणार का असा थेट प्रश्नच तो त्याच्या आईला विचारतो. 

 

यावर जेव्हा आई होकारार्थी उत्तर देते, तेव्हा त्या लहानग्याच्या डोळ्यातून नकळत आनंदाश्रू वाहू लागतात.

पावसाळी हवेमुळे आलं लगेच खराब होतं, सडतं, वास येतो? ५ उपाय, आलं राहील एकदम फ्रेश

तो खूप खूप भावनिक होऊन जातो. याच क्षणाची मी किती दिवसांपासून वाट बघत होतो.. असं बोलता बोलता त्याला अक्षरश: भावना आवरणेही कठीण होऊन जाते. त्याच्या बदलत जाणाऱ्या भावभावनांमुळे नेटिझन्सकडून हा व्हिडिओ वारंवार बघितला जात आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्रामप्रेग्नंसीलहान मुलं