Lokmat Sakhi >Social Viral > अद्भुत! १० वर्षांच्या मुलांचे जबरदस्त मंत्रोच्चार ऐकून नेटिझन्स चक्रावले; पाहा व्हायरल व्हिडिओ

अद्भुत! १० वर्षांच्या मुलांचे जबरदस्त मंत्रोच्चार ऐकून नेटिझन्स चक्रावले; पाहा व्हायरल व्हिडिओ

Little boys chanting video goes viral on social media : सध्या सोशल मीडियावर याच्याशी निगडीत एक जुगाड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण  चकीत झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2023 12:55 PM2023-01-04T12:55:48+5:302023-01-04T13:06:19+5:30

Little boys chanting video goes viral on social media : सध्या सोशल मीडियावर याच्याशी निगडीत एक जुगाड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण  चकीत झाले आहेत.

Little boys chanting video goes viral on social media | अद्भुत! १० वर्षांच्या मुलांचे जबरदस्त मंत्रोच्चार ऐकून नेटिझन्स चक्रावले; पाहा व्हायरल व्हिडिओ

अद्भुत! १० वर्षांच्या मुलांचे जबरदस्त मंत्रोच्चार ऐकून नेटिझन्स चक्रावले; पाहा व्हायरल व्हिडिओ

असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी लोक संस्कृत भाषेत बोलायचे. संस्कृतला देववाणी असंही म्हटलं जातं. मंत्रोच्चारही संस्कृतातूनच केले जातात.  हळूहळू या भाषेचा लोकांना विसर पडत चालला आहे. शाळा, कॉलेजांमध्येही खूप कमी प्रमाणात या भाषेचे धडे दिले जातात. सध्याच्या काळात संस्कृत बोलणारी खूप माणसं क्वचितच सापडतात. सध्या सोशल मीडियावर याच्याशी निगडीत एक जुगाड व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहून अनेकजण  चकीत झाले आहेत.(Little boys chanting video goes viral on social media)

या व्हिडिओमध्ये २ लहान मुलं मंत्रोच्चार करताना दिसत आहेत.  त्यांचा मंत्र वाचण्याचा वेग पाहून ते कोणीतरी महान ऋषीमुनी असल्यासारखे वाटतात. त्याचं वय १० ते १२ वर्ष असाव.  ते दोघंही पारंपारीक वेषभूषेत आहेत. हे दोघंहीजण इतक्या सुंदर पद्धतीनं मंत्रोच्चार करत करत आहे ऐकल्यानंतर प्रत्येकाचंच मन आनंदीत होत आहे. इतके कठीण मंत्र लक्षात ठेवण काही सोपं  काम नाही. तरीही त्या मुलांनी मंत्र अगदी व्यवस्थित तोंडपाठ केले आहेत.  सोशल मीडियावर या दोघांवरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 वजनदार स्त्रियांचे जोडीदार जास्त आनंदी असतात कारण..

मनाला हा भिडणारा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर   @MahantYogiG  नावाच्या आयडीवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आलं की, सनातन धर्माचा विजय असतो. ३२ सेकंदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३३ हजारपेक्षा जास्तवेळा पाहण्यात आलं आहे. आतापर्यंत ५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Web Title: Little boys chanting video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.