घरात भावंडं असली की त्यांची भांडणं ठरलेलीच असतात. भांडणासाठी अगदी कोणतंही किरकोळ कारण पुरेसं ठरतं. एकदा भांडण झालं मी मग पुढचे काही तास एकमेकांचा खूप राग- राग करणारीही अनेक असतात. पण जेव्हा त्यांच्यापैकी एखादं कुणी रडू लागतं किंवा एखाद्याला काही त्रास होतो, तेव्हा दुसरा मात्र प्रचंड अस्वस्थ होतो. आपल्या भावाला किंवा बहिणीला (Emotional Video of Brother- Sister's Love) होणारं दु:ख कमी करण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न असतो. असाच प्रयत्न सुरू आहे या ७ वर्षांच्या चिमुरड्याचा. सध्या सोशल मिडियावर एका रडणाऱ्या ताईचा आणि तिला समजावणाऱ्या तिच्या धाकट्या भावाचा (Little brother trying to console his elder sister) व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
p.a.pz या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला जे कॅप्शन देण्यात आलं आहे, त्यावरून असं दिसत आहे की ती ताई एकदा रडत होती. तिचा भाऊ तिच्या आसपास खेळत होता.
वेटलॉससाठी तुम्हीही लिंबू पिळून कॉफी पिता? खरंच त्याचा फायदा होतो की.. एक्सपर्ट सांगतात...
त्याचं जेव्हा आपल्या रडणाऱ्या बहिणीकडे लक्ष गेलं, तेव्हा तो लगेचच उठला आणि तिच्याजवळ जाऊन तिला रडण्याचं कारण विचारू लागला. पण भाऊ खूपच लहान असल्याने बहिण त्याला काही सांगू शकली नाही. ताईच्या रडण्याचं कारण कळेना म्हणून बिचारा आणखीनच अस्वस्थ झाला आणि त्याच्यापरीने तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला.
ताईचं रडणं पाहून त्याच्या चेहऱ्यावर बदलत जाणारे भाव नेटिझन्सला भारीच आवडले असून त्याच्या भावनिक स्वभावाचं अनेक जण कौतूक करत आहेत.
बाप रे बाप! घटस्फोटानंतर किम कार्दशियनला पतीकडून मिळणार दरमहा चक्क १.६ कोटींची पोटगी
मागे काही दिवसांपुर्वी बहिण- भावाचं प्रेम दाखवणारा असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर गाजत होता. यात अवघ्या २- ३ वर्षे वयाची चिमुकली तिच्या दादाला मारणाऱ्या आईला रागावत होती. तो व्हिडिओही नेटिझन्सचे भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळविणारा ठरला.