Lokmat Sakhi >Social Viral > "कर्ज फेडण्यासाठी माझ्या आई- बाबांना थोडे पैसे दे..." चिमुकलीने सांताला लिहीलेलं पत्र वाचून तुमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील

"कर्ज फेडण्यासाठी माझ्या आई- बाबांना थोडे पैसे दे..." चिमुकलीने सांताला लिहीलेलं पत्र वाचून तुमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील

Little Girl Ask Santa clause To Bring Money For her Mother and Father : एका लहानगीने नुकतेच असेच एक इमोशनल पत्र लिहीले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2022 01:25 PM2022-12-15T13:25:26+5:302022-12-15T13:33:36+5:30

Little Girl Ask Santa clause To Bring Money For her Mother and Father : एका लहानगीने नुकतेच असेच एक इमोशनल पत्र लिहीले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले.

Little Girl Ask Santa clause To Bring Money For her Mother and Father : "Give my mom and dad a little money to pay off the debt..." A letter written by a toddler to Santa will bring tears to your eyes. | "कर्ज फेडण्यासाठी माझ्या आई- बाबांना थोडे पैसे दे..." चिमुकलीने सांताला लिहीलेलं पत्र वाचून तुमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील

"कर्ज फेडण्यासाठी माझ्या आई- बाबांना थोडे पैसे दे..." चिमुकलीने सांताला लिहीलेलं पत्र वाचून तुमच्याही डोळ्यांच्या कडा पाणावतील

Highlightsलहान मुलं काय करतील सांगता येत नाही, त्यांचा निरागसपणा अनेकदा आपल्याला थक्क करतोसांताकडे स्वत:साठी काही मागण्याऐवजी चिमुकलीने आई-वडिलांसाठी मागितले स्पेशल गिफ्ट

डिसेंबर महिना जगभरात ख्रिसमसचा महिना असल्याने सेलिब्रेशन असते. या काळात सांताक्लॉज येऊन आपल्याला काहीतरी गिफ्ट देऊन जातो अशी गोष्ट लहान मुलांना सांगितली जाते. लहान मुलांच्या मनात या गोष्टी अतिशय पक्क्या असतात. नाताळ जवळ आला की सांताने आपल्याला काय द्यायला हवे याचे प्लॅनिंगही त्यांच्या डोक्यात सुरू झालेले असते. सांताला आपण पत्राद्वारे एखादी गोष्ट कळवली तर सांता ती पूर्ण करतो असे मानून या काळात लहान मुलं सांताला पत्र लिहीतात. एका लहानगीने नुकतेच असेच एक इमोशनल पत्र लिहीले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले (Little Girl Ask Santa clause To Bring Money For her Mother and Father). 

वय लहान असलं तरी काही वेळी लहान मुलांना असणारी समज आपल्याला थक्क करुन जाणारी असते. पालक म्हणून आपण कधी चिंतेत असलो किंवा घरातील परिस्थिती तणावाची असली की आपण सहसा ती मुलांपर्यंत पोहचू देत नाही. मात्र मुलांपासून या गोष्टी लपल्यावाचून राहत नाहीत.

एका चिमुकलीचे सांताला लिहीलेल्या पत्रात आपल्या आई वडीलांना थोडे पैसे दे अशी मागणी सांताक्लॉजला केली आहे. माझे आईवडील पैशांसाठी खूप कष्ट करत असून त्यांनी बीलं भरण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी काही पैसे पाठव अशी मागणी या चिमुकलीने सांताकडे केली आहे. तिचा निरागसपणा पाहून आपल्यालाही तिचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही. 

ब्रिटनमधील एका महिलेने तिच्या भाचीने लिहीलेले हे पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. माझ्या बहिणीला आताच हे पत्र मिळाले असून तिच्या ८ वर्षाच्या मुलीने ते लिहीले असल्याचे या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. हे पत्र वाचून इतक्या लहान वयात तिला हे समजतंय हे पाहून मला खरंच रडू आलं असंही या कॅप्शनमध्ये लिहीले आहे. विशेष म्हणजे या चिमुकलीने स्वत:साठी सांताक्लॉजकडे काही मागायचे सोडून आपल्या आईवडीलांसाठी सांताकडे अशाप्रकारची मागणी केली आहे. मुलांना लहान वयात येणारी समज अनेकदा आपल्याला थक्क करुन टाकणारी असते त्याचेच हे एक उदाहरण आहे.  

 

Web Title: Little Girl Ask Santa clause To Bring Money For her Mother and Father : "Give my mom and dad a little money to pay off the debt..." A letter written by a toddler to Santa will bring tears to your eyes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.