मुली कमी वयातच घराची जबाबदारी सांभाळतात. परक्याचं धन ज्यांना म्हटलं जात अशा लेकी आपल्या आई वडीलांच्या सगळ्यात जास्त जवळ असतात. (Little girl care for her father daughter) आजच्या काळात मुली मुलांपेक्षा कमी नसल्याचं सर्वच क्षेत्रात दिसून येतं. मुली निस्वार्थ भावनेनं आपल्या आई वडिलांची सेवा करता आणि त्यांना आयुष्यभर सांभाळतात. सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून युजर्स भावूक झाले आहेत. हा व्हिडिओ जुना असला तरी पुन्हा पुन्हा बघितला जात आहे. (Little girl care for her father daughter emotional video goes viral on social media)
इंटरनेटवर सर्वांना भावूक करणारा हा व्हिडिओ एका गोंडस चिमुरडीचा आहे, जी आपल्या वडिलांच्या टेन्शनचा विचार करून रडत आहे. व्हिडिओमध्ये मुलगी तिच्या वडिलांबद्दल अशा काही गोष्टी सांगते, जे ऐकून फक्त वडिलांचेच नाही तर सगळ्यांचेच डोळे पाणावतात. व्हिडिओमध्ये मुलगी ढसाढसा रडताना दिसत आहे. यादरम्यान समोर बसलेल्या तिच्या आईने विचारले असता ती रडण्याचे कारणही सांगत आहे.
मूल रडत असताना तिची आई तिचे रेकॉर्डिंग करते. आईने रडण्याचे कारण विचारले असता मुलगी म्हणाली, आधी कॅमेराचे रेकॉर्डिंग बंद करा, मग सांगेन. मुलगी पुढे म्हणते, 'मला माझ्या वडिलांची खूप काळजी वाटते, जेव्हा ते दुकानात जातात तेव्हा संध्याकाळपर्यंत जेवत नाहीत, उपाशीपोटी काम करतात. ते रात्री जेवतात, पण संध्याकाळी त्यांचे पोट रिकामेच राहते. जगातल्या प्रत्येक मुलीला आपल्या वडीलांची काळजी असते म्हणूनच त्या बारीक होत जातात.
नखं नसलेला हात पाहून नेटिझन्स चक्रावले; हा आजार की आणखी काही? जाणून घ्या
ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर '@Gulzar_sahab' नावाने हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो पाहून यूजर्सचेही डोळे भरून येत आहेत. व्हिडिओला खूप पसंती दिली जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सही मुलीच्या निरागसतेवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. मुलीचे बोलणे, तिचे रडणे ऐकून आपल्या कष्टकरी वडिलांची सगळ्यांना आठवण येत आरहे.