Lokmat Sakhi >Social Viral > थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं

थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं

Little girl feeds her father fruits : साक्षी मेहरोत्रा ​​यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी लोकल ट्रेनमध्ये तिच्या वडिलांना फळे खाऊ घालताना दिसत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 09:39 AM2022-07-26T09:39:00+5:302022-07-26T14:06:09+5:30

Little girl feeds her father fruits : साक्षी मेहरोत्रा ​​यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी लोकल ट्रेनमध्ये तिच्या वडिलांना फळे खाऊ घालताना दिसत आहे

Little girl feeds her father fruits in mumbai local train heartwarming viral video wins hearts | थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं

थकलेल्या वडिलांना लेकीनं मायेनं भरवली फळं, धावत्या लोकलनं पाहिलं बापलेकीचं प्रेमळ नातं

बाप आणि मुलगी यांच्या नात्यातील गोडवाच काही वेगळाच. मुलगी कितीही मोठी झाली तरी तिच्या वडिलांसाठी ती नेहमीच लहानच असते. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये चित्रित केलेला व्हिडिओ वडील आणि त्यांच्या मुलीमधला एक मौल्यवान क्षण उत्तम प्रकारे  मांडतो.  (Little girl feeds her father fruits in mumbai local tain heartwarming viral video wins hearts) भुकेलेल्या वडिलांना चिमुरडी भरवण्याचा प्रयत्न करते. इतक्या लहान वयातही तिला वडिलांची काळजी वाटते हे पाहून तिचं खूप कौतुक वाटतं. 

साक्षी मेहरोत्रा ​​यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी लोकल ट्रेनमध्ये तिच्या वडिलांना काही फळे खाऊ घालताना दिसत आहे.ती लहान मुलगी वडीलांना फळं भरवते मग ते तिच्या डोक्यावरून हात फिरवतात नंतर ती फळं तिला खायला सांगतात. बाप लेकीचा हा व्हिडिओ पाहून डोळे भरून येतात. 

भल्या सकाळी तरुणीला झोपेतून उठवायला आला हत्ती! खिडकीजवळ उभ्या हत्तीला पाहून झोप उडणार नाही तर काय?

या क्लिपला 59 हजार पेक्षा जास्त वेळा लाइक केले गेले आहे आणि अप्रतिम प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींना  व्हिडीओ पाहून रडणं थांबवता आलेले नाही. तर काहींनी क्लिपमुळे त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण कशी झाली याबद्दल लिहिले.  एका इंस्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले, “हे माझ्या हृदयाला स्पर्शून गेले. शेवटच्या मिठीनं माझं मन जिंकले," दुसर्‍याने कमेंट केली की हे दृश्य पाहून मला माझ्या आई वडिलांची आठवण आली.

टोल नाक्यावर ट्रकनं जोरदार धडक दिली; जीवाची बाजी लावून तरुणी मदतीला धावली, पाहा व्हिडिओ 

लोकल ट्रेनमध्ये बरेच कामगार, फेरीवाले आपल्या लहान  लहान बाळांना घेऊन कामं करताना दिसतात. कामासोबतच त्यांना आपल्या लहान मुलांच्या खाण्यापिण्याचीही काळजी करावी लागते. पाठीवर बाळ घेऊन कानातले, बांगड्या विकत असलेल्या स्त्रिया अनेकदा लोकल ट्रेनमध्ये दिसतात. अशातच या व्हिडिओमधील लेकीला वडिलांची वाटणारी  काळजी आणि त्यांचं आपसातलं नातं पाहून अनेकजण इमोशनल झाले. पैसे-श्रीमंती यापलिकडे मायेचं नातं सांगणारी ही दृश्य म्हणूनच अनेकांना आवडली.

Web Title: Little girl feeds her father fruits in mumbai local train heartwarming viral video wins hearts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.