सोशल मीडियावर तुम्ही तुर्की आईस्क्रीमचे खूप व्हिडिओज पाहिले असतील. तुर्की आइस्क्रीम विक्रेते सहजासहजी आपल्याकडचं आईस्क्रीम कोणालाही देत नाहीत. खेळकर पद्धतीनं ते आपली कला दाखवत मुलांना आईस्क्रीम देतात. लहान मुले असो किंवा प्रौढ, तुर्की आईस्क्रीम मिळवणे सोपे नाही, याचे कारण तुम्ही अनेक व्हिडिओंमध्ये पाहिले असेल. (Little girl gets furious as turkish ice cream seller)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आईस्क्रीम विक्रेता आईस्क्रीम देत नाही म्हणून या चिमुरडीला खूप राग येतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (Little girl gets furious as turkish ice cream seller plays fun trick on her internet has mixed reactions) आपल्याला मुद्दाम आईस्क्रीम देत नाहीये असं वाटून तिनं रडायला सुरूवात केली.
क्यों परेशान कर रहे हो बेचारी को 😂👏😎 pic.twitter.com/V5slqNAqwr
— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) November 22, 2022
या व्हिडिओला जवळपास ५८ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, तुम्ही एक लहान मुलगी चिडलेली आणि रडत असल्याचे पाहू शकता कारण आइस्क्रीम विक्रेता तिची खोटी, खोडकर फसवणूक थांबवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. त्याने आईस्क्रीम कोन तिच्या खूप जवळ आणला, नंतर तो पुन्हा काढून घेतला आणि तिला सतत चिडवत राहिला.
लग्न म्हणजे काय? शाळेतल्या मुलाचा निबंध वाचून शिक्षकच चकीत झाले, म्हणाले.....
चिमुरडीला आता अजिबात धीर नव्हता आणि ती त्या माणसाला ओरडली. ती रडायला लागल्यावरच या माणसाने आईस्क्रीम तिच्या हातात दिले. व्हिडिओच्या कमेंटसमध्ये विनोदी प्रतिसाद रिएक्शन्स मिळत आहे. असे काही सोशल मीडिया युजर्स आहेत ज्यांना रडणाऱ्या चिमुरडीची कीव आली. हे खूपच वाईट आहे. लहान मुलांना रडवू नये अशी कमेंट एका युजरनं केली आहे. आतापर्यंत ट्विटरवर ७० हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून इंस्टाग्रामवर गेल्या ३ दिवसांपासून हा व्हिडिओ धुमाकूळ घालत आहे.