Join us  

little girl puts lipstick on ips father : तिच्यासाठी कायपण! IPS अधिकाऱ्याच्या ओठांवर लेकीनं लावली लिपस्टीक; पाहा काळजाला भिडणारा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 2:17 PM

little girl puts lipstick on ips father : सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्यूट व्हिडिओने हजारो लोकांची मनं जिंकली आहेत.

वडील आणि मुलीचे नाते हे जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ नाते आहे. या अनमोल प्रेमाचे प्रतिबिंब दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक लहान मुलगी आपल्या IPS वडिलांच्या ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे. (little girl puts lipstick on ips father see cute viral video) आपल्या लेकीच्या आनंदासाठी काहीही करण्याची बापाची तयारी असते. हे या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसून येईल. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्यूट व्हिडिओने हजारो लोकांची मनं जिंकली आहेत. हा व्हिडिओ मुलीचे वडील, आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे, जे तामिळनाडू पोलिस विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेत एसपी आहेत.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की विजयकुमार यांची मुलगी ओठांवर लिपस्टिक लावताना दिसत आहे. तिच्या जवळच इतर अनेक मेक-अपच्या वस्तू आहेत, ज्या तिला तिच्या वडिलांसाठी वापरायच्या आहेत. आयपीएस अधिकाऱ्याने व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले, "मुली/मुले जगात सर्व सुख घेऊन येतात. माझी मुलगी नीला माझ्यासोबत आहे."

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. मुलगी आणि वडिलांचा हा क्यूट व्हिडिओ पाहून लोक खूप खुश होत आहेत. लोक व्हिडिओवर अनेक सुंदर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले - नीला खूप क्यूट आहे आणि दोघांमधील संभाषण किती छान आहे. आणखी एका युजरने म्हटले की, 'आयपीएस अधिकाऱ्याला लिपस्टिक लावण्याचे धाडस फक्त मुलींमध्ये असते. 

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरल