Join us  

'भगवान मुझे दुसरी मम्मी दे दो'! असं का म्हणतेय एक चिमुकली पोर, व्हिडिओ व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2022 11:29 AM

little girl request god to change her mother while crying cute video viral : सोशल मीडियामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या गोष्टी आपल्याला लगेच समजतात..

ठळक मुद्देतिच्या क्यूटनेसचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे. या पोस्टवर नेटीझन्सनी भरभरुन प्रतिक्रियाही दिल्या आहेत. लहान मुलांचा निरागसपणा अनेकदा आपल्याला थक्क करणारा असतो

लहान मुलांचं निरागसपण खूपच छान असतं. आपल्या आजुबाजूला लहान मुलं असतील तर आपल्याला वेळोवेळी त्याची प्रचिती येते. लहान वयात त्यांचे बोलणे, हावभाव या सगळ्या गोष्टींचे आपल्याला खूप कौतुकही वाटते. काही वेळा हे लहानगे काय बोलतात याचा अर्थही त्यांना कळत नसतो पण त्यांचा क्यूटनेस पाहून आपल्याला त्यांचे कौतुक वाटल्याशिवाय राहत नाही (cute video viral). सोशल मीडियावर तर काही मिनीटांमध्ये गोष्टी जगभरात पोहचत असल्याने जगाच्या कानाकोपऱ्याच घडणारी घटनाही अगदी सहज आपल्यापर्यंत पोहोचते. नुकताच असाच एका लहानगीचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात एक लहानगी देवाला आई बदलून देण्यासाठी प्रार्थना करत असल्याचे दिसते (little girl request god to change her mother while crying). 

 

आता ही मुलगी असे का करते असा साहजिकच प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल. तर एक आई आपल्या लहान मुलीचा अभ्यास घेत आहे, त्यावेळी ही लहानगी कोणत्या तरी कारणावरुन आपल्या आईवर चिडते आणि थेट देवालाच ‘भगवानजी मुझे बदलके दुसरी मम्मी देदो’ असं म्हणताना दिसत आहे. तिचा हे म्हणण्याचा टोन आणि क्यूटनेसमुळे सोशल मीडियावर हा व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल झाला आहे. आई आपल्याला लहानपणापासून अभ्यास करायला लावते आणि चांगल्या सवयी लावते म्हणूनच आपण शिकून मोठे होतो हे कळण्याएवढे या मुलीचे वय नाही. मात्र इतक्या गोंडसपणे देवाला अशी मागणी करण्याच्या तिच्या कल्पनाशक्तीमुळे तिचे कौतुक होत आहे.  

Thesarcasmvibe या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून ८ लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. लहान मुलांना अनेकदा आईवडील लावतात ती शिस्त नको असते. त्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायचे असल्याने आईने काही सांगितले की ते वैतागतात. त्याच वैतागातून रडत रडत ही मुलगी आई बदलून हवी असे म्हणत असावी. आई ही आपल्या घडवणारी, आपल्यासाठी झटणारी आणि आपल्या लेकरांवर मनापासून प्रेम करणारी व्यक्ती असते. त्यामुळे प्रत्यक्षात आई अशी बदलता येत नाही हे तिला कोण सांगणार. ते समजावण्याचे तिचे वयही नाही. पण तिच्या क्यूटनेसचे सोशल मीडियावर अनेकांनी कौतुक केले आहे. या पोस्टवर नेटीझन्सनी भरभरुन प्रतिक्रियाही दिल्या आहेत. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडियालहान मुलं