लहान मुलं कधी काय करतील किंवा कुणासमोर काय बोलतील, याचा खरोखरच काही नेम नसतो. किंवा त्यांच्यासमोर आपण बोलत असलेल्या कोणत्या गोष्टीचा ते कसा अर्थ घेतील आणि तीच गोष्ट आपल्यावर कशी उलटवतील हे ही सांगता येत नाही. इथे या एक व्यक्तीबरोबर तसंच काहीसं झालं. लॅपटॉपमध्ये (Little girl washing laptop in a tub) गार्बेज खूप झालं, असं तो सहज कुणाला तरी सांगताना म्हणाला. ते त्याच्या लेकीनं ऐकलं आणि मग नंतर तिने जे काही केलं, त्यामुळे त्याच्यावर डोकं धरून बसण्याची वेळ आली.
सध्या सोशल मिडियावर हा व्हिडिओ चांगलाच गाजतो आहे. AsiaOne या फेसबूक पेजवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये साधारण तीन- साडेतीन वर्षांची एक चिमुरडी दिसते आहे. आणि ती तिच्या बाबांच्या लॅपटॉपसोबत जे काही करते आहे, ते पाहून तर क्षणभर हसावं की रडावं हेच कळत नाही. ती मुलगी नेमकी कोणत्या देशातली आहे, हे काही व्हिडिओवरून लक्षात येत नाही. पण व्हिडिओ मात्र जगभर चांगलाच व्हायरल झाला असून आतापर्यंत त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.
या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की एक पाण्याने भरलेला एक टब आहे. त्या टबसमोर एक लहानशी मुलगी आहे आणि त्या टबमध्ये चक्क ॲप्पलचा लॅपटॉप पाण्यात भिजत पडलेला आहे.
दिवाळीसाठी मीरा कपूरने बनवलेल्या काजू कतलीचे फोटो व्हायरल, काय आहे त्या काजू कतलीत स्पेशल?
टबमध्ये बुडवून बुडवून ती मुलगी लॅपटॉप धूत आहे. एवढंच नाही तर बाजूलाच असलेली साबण घेऊन ती घासणीने तो लॅपटॉप खसाखस घासते आहे. वडिलांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोष्टींची अशा पद्धतीने काळजी घेणारी लेक पाहून नेटकरी चांगलेच चक्रावले आहेत आणि त्यापैकी काही बाबा त्यांचे- त्यांचे लॅपटॉप चिमुकल्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी आता आम्ही अधिक काळजी घेऊ, असंही म्हणत आहेत.