जर तुम्ही कुठे जायला निघाला असाल आणि त्याचवेळी तुमच्या अंगावर चिखल उडून कपडे खराब झाले तर संताप अनावर होईल. पावसाळ्यात बरेच चारचाकी वाहनांचे चालक गाड्या खड्ड्यांच्या, पाणी भरलेल्या रस्त्यांवरूनही जोरजोरात चालवतात. यामुळे रस्त्यावर चालत असलेल्या इतर लोकांना त्रासाचा सामना करावा लागतो. चिखल, घाणेरडं पाणी उडून पूर्ण कपडे खराब होतात आणि त्यामुळे मूड खराब होतो. (Viral pic shows little schoolgirl covered in mud twitter expresses anger)
सध्या सोशल मीडियावर चिखल उडल्यामुळे पूर्ण कपडे आणि चेहरा खराब झालेल्या एका शाळकरी मुलीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. IAS अधिकारी अवनीश शरण यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोत शालेय गणवेशावर चिखल उडल्यानं उदास झालेली चिमुरडी दिसत आहे. या फोटोत तिचा चेहरा, कपडे, दप्तर सगळे चिखलामुळे खराब होते आणि नाराज होते. ही पोस्ट ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. (Little School girl Covered in Mud)
'मुले शाळेत जात आहेत. त्यामुळे गाडीचा वेग जरा कमी करा,' असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, 'आपल्या सर्वांना अधिक संवेदनशील असणे आवश्यक आहे.' दुसर्या वापरकर्त्याने कमेंट केली, ' हे खरंच खूप वाईट आहे. मला या व्हिडिओनं आमच्या शाळेच्या दिवसांची आठवण करून दिली." आतापर्यंत ४४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे तर संतापजनक कमेंट्स या पोस्टवर केल्या जात आहेत.