"सांग.. सांग.. भोलानाथ पाऊस पडेल काय शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?" या बालगीताच्या ओळी आपल्यापैकी प्रत्येकालाच त्याच बालपण आठवून देतील अशा आहेत. कधी गृहपाठ पूर्ण झाला नाही, कधी पाढेच पाठ नाही झालेत, खूप पाऊस झाला आहे, पोट दुखत आहे, परीक्षेची भीती यासारखी शाळेत न जाण्यासाठी मुलांकडे अनेक कारणे असतात. कोणते ना कोणते कारण पुढे करून एक दिवस का होईना पण शाळेला बुट्टी मारता यावी याच प्रयत्नांत लहान मुलं असतात. मग आई वडिलांनी शाळेत जाण्यासाठी ओरडा दिला की ही मुलं रडतात. लहान मुलांना शाळेत पाठवणे म्हणजे आई - वडिलांच्या डोक्याला तापचं असतो. पण जर आपला पाल्य रोज उठून हसत खेळत शाळेत जात असेल तर त्या पालकांना याहून मोठे सुख नाही, अशी फिलिंग येईल. अशाच एका शाळकरी मुलीचा शाळेत जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून आपल्या पाल्यानेदेखील असच हसऱ्या चेहेऱ्याने शाळेत जावं अशी इच्छा प्रत्येक आई - वडील करतील(little school girl dancing to Pyaar Aa Gaya Re).
नक्की काय आहे या व्हिडिओत ?
२६ सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये, एक शाळकरी मुलगी आपल्या शाळेच्या गणवेशात दिसत आहे. या मुलीने हिरव्या रंगाचा कोट, हातमोजे व कानटोपी परिधान केलं केले आहे. ही मुलगी शाळेच्या बसमधून उडी मारून खाली उतरते व संजय दत्त वर चित्रित झालेल्या 'प्यार आ गया रे' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिचा हा डान्स प्रकार पाहून ती एक डान्सर असल्यासारखे वाटत आहे. या मुलीच्या डान्स स्टेप्स व चेहेऱ्यावरील हावभाव बघून प्रत्येकजण तिचे कौतुक करत आहे. तिचा गोड अभिनय आणि डान्स बघून मन प्रफुल्लित होते.
नेटकरी काय म्हणत आहेत ?
या डान्स करणाऱ्या शाळकरी मुलीचा व्हिडीओ ट्विटर वरील आरझ-ए-इश्क नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 'हे सुंदर आहे' अशी कॅप्शन देऊन हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ ऑनलाईन पोस्ट केल्या लगेच त्याला २५००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. ट्विटर युजर्संना या मुलीचा डान्स व तिच्या चेहेऱ्यावरील हावभाव आवडले आहेत. 'ती एक दिवस नक्की स्टार होणार', 'खरं टॅलेंट', 'सो क्युट', 'खूप छान' अशा असंख्य कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या शाळकरी मुलीचे कौतुक केले आहे.