Lokmat Sakhi >Social Viral > कमाल! फूड डिलिव्हरीसाठी तिने केला चक्क ३० हजार किमीचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल

कमाल! फूड डिलिव्हरीसाठी तिने केला चक्क ३० हजार किमीचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल

30,000 km Journey For Food Delivery: ऐकावं ते नवलच... असंच काहीसं हे प्रकरण आहे. बघा या महिलेची कमाल. डबा पोहोचविण्यासाठी तिने चक्क ३० हजार किमीचा प्रवास केला आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2022 06:45 PM2022-11-18T18:45:39+5:302022-11-18T18:48:04+5:30

30,000 km Journey For Food Delivery: ऐकावं ते नवलच... असंच काहीसं हे प्रकरण आहे. बघा या महिलेची कमाल. डबा पोहोचविण्यासाठी तिने चक्क ३० हजार किमीचा प्रवास केला आहे. 

Longest journey of a woman near about 30,000 km for food delivery from Singapore to Antarctica | कमाल! फूड डिलिव्हरीसाठी तिने केला चक्क ३० हजार किमीचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल

कमाल! फूड डिलिव्हरीसाठी तिने केला चक्क ३० हजार किमीचा प्रवास, व्हिडिओ व्हायरल

Highlightsखाद्य पदार्थांचा डबा पोहोचविण्यासाठी हा आजपर्यंतचा सगळ्यात लांब प्रवास असावा, असाही अंदाज तिने या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे.

फूड डिलिव्हरी करण्यासाठी ५, १० किंवा अगदी फार फार तर २० किमीचा प्रवास करून येणारे एजंट आपण बघत असतो. एवढ्या लांबून तो व्यक्ती आपल्या घरी आला, म्हणून मनातल्या मनात त्याचं कौतूकही करतो. पण इथे हे एक प्रकरण मात्र फारच वेगळं  आणि वाचणाऱ्या प्रत्येकाला अचंबित करणारं आहे. कारण एक महिला खाण्याचा डबा पोहोचविण्यासाठी चक्क सिंगापूर ते अंटार्क्टिका (Singapore to Antarctica) असा तब्बल ३० हजार किमीचा प्रवास करून गेली आहे.(journey of near about 30,000 km for food delivery) 

 

nomadonbudget या इन्स्टाग्राम पेजवरून ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. Today, I did a special food delivery to Antarctica 🇦🇶 from Singapore 🇸🇬! असं कॅप्शनही तिने या पोस्टला दिलं आहे.

बघा कशी बहरलीये प्रिती झिंटाची 'घर की खेती'! बागेत पिकलेल्या संत्रीविषयी म्हणाली.... 

यात ती कसा- कसा प्रवास करत सिंगापूरहून अंटार्क्टिकाला पोहोचली, हे सगळं दाखवण्यात आलं आहे. काही वेळा तिला विमान प्रवासही करावा लागला तर काही वेळा बर्फ, चिखल यातून मार्ग काढत चालावं लागलं. खाद्य पदार्थांचा डबा पोहोचविण्यासाठी हा आजपर्यंतचा सगळ्यात लांब प्रवास असावा, असाही अंदाज तिने या पोस्टद्वारे व्यक्त केला आहे. या प्रवासात प्रत्येकवेळी तिच्या हातात एक पार्सल दिसते. 

 

खाण्याचा डबा घेऊन एवढ्या लांब जाणे हा आपल्यासाठी अतिशय एक्सायटिंग अनुभव आहे. तसेच सिंगापूरहून अंटार्क्टिकाला अन्न पोहोचविण्याची वेळ वारंवार येत नाही.

चहाची गाळणी खूपच काळवंडली? १ सोपा उपाय, कमी मेहनतीत गाळणी होईल चकाचक

त्यामुळे आपल्यासाठी हा प्रवास खूपच खास होता, असंही ती म्हणते आहे. ती कुणासाठी आणि का बरं एवढ्या लांब डबा घेऊन गेली, तिचा फूड डिलिव्हरी करण्याचा कोणता व्यवसाय आहे का, असे प्रश्न आपल्याला हा व्हिडिओ पाहून पडतात. पण त्याबाबतची काहीही माहिती या पोस्टमध्ये देण्यात आलेली नाही. 

 

Web Title: Longest journey of a woman near about 30,000 km for food delivery from Singapore to Antarctica

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.