Lokmat Sakhi >Social Viral > भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो 

भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो 

Viral Post: हिंमत असावी तर अशी.... असं कुणीही अगदी सहज म्हणावं अशी ही घटना आहे. म्हणूनच तर सोशल मिडियावर (social media) या तरुणीची पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2022 12:49 PM2022-06-27T12:49:35+5:302022-06-27T12:50:38+5:30

Viral Post: हिंमत असावी तर अशी.... असं कुणीही अगदी सहज म्हणावं अशी ही घटना आहे. म्हणूनच तर सोशल मिडियावर (social media) या तरुणीची पोस्ट जबरदस्त व्हायरल होत आहे.

Look at her daring, Women caught snake in her hand..... | भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो 

भले शाब्बास! दुकानात शिरलेला साप तिनं सरळ हातात उचलला आणि.. व्हायरल फोटो 

Highlightsमोठ्या हिंमतीने अगदी सहजपणे सापाला उचलणारी एक डॅशिंग वनपाल अधिकारी आणि तिच्या आजूबाजूला साप पाहून घाबरलेले लोक, असं काहीसं चित्र या पोस्टमध्ये दिसतं आहे.

मुलगा असो किंवा मुलगी, हिंमतीने तोंड दिलं तर कोणत्याही संकटावर मात करता येते. हे अगदी खरं. पण काही अपवाद सोडले तर तरुणी- महिला हिंमत, धैर्य या बाबतीत पुरुषांपेक्षा जरा कमी पडतात. मोठमोठी संकटं तर सोडाच पण घरात अगदी पाल, उंदिर, झुरळ दिसलं तरी अनेकींची भीतीने गाळण उडते. काही जणी एवढ्या घाबरून जातात की त्यांचा आरडा- ओरडा ऐकून तो मुका जीवच त्यांच्यापासून कोसो दूर पळून जातो. पण इथे मात्र एका तरुणीने कमाल केली आहे. आणि म्हणूनच तर तिची पोस्ट सोशल मिडियावर (social viral) जबरदस्त व्हायरल झाली आहे. (Women caught snake in her hand)

 

Sonam Meena यांच्या ट्विटर हॅण्डलवरून (twitter share) ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. साेनम या राजस्थान वन विभागात वनपाल अधिकारी म्हणून काम करतात. ''स्नेक कैचर जंगल की शेरनी, नाम ही काफी हैं....'' अशा शब्दांत त्यांनी स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचं वर्णन केलं आहे. त्यांनी त्यांचा एक फोटो नुकताच सोशल ट्विटरवर शेअर केला असून हा फोटो पाहून नेटकरी त्यांच्या हिमतीची दाद देत आहेत.

 

या फोटोमध्ये असं दिसत आहे आणि Sonam Meena यांनी जी पोस्ट शेअर केली आहे, त्यावरून असं लक्षात येत आहे की उदयपुर परिसरातील एका दुकानात एक साप निघाला. साप पाहताच लोकांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर याविषयी संबंधित वनविभागाला निरोप गेला असता मीना या काही वेळातच तिथे आल्या आणि त्यांनी चक्क तो साप हाताने उचलून पुढील ठिकाणी रवाना केला. मोठ्या हिंमतीने अगदी सहजपणे सापाला उचलणारी एक डॅशिंग वनपाल अधिकारी आणि तिच्या आजूबाजूला साप पाहून घाबरलेले लोक, असं काहीसं चित्र या पोस्टमध्ये दिसतं आहे. मीना या अगदी तरूण असून त्यांच्या वेगवेगळ्या ट्विटर पोस्टवरून ''जंगल की शेरनी, नाम ही काफी हैं....'' या ओळी त्यांच्यासाठी अगदी परफेक्ट आहेत, हे दिसून येतं. 

 

Web Title: Look at her daring, Women caught snake in her hand.....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.