कोणाच्याही गर्लफ्रेंडविषयी चेष्टेने जे काही बोललं जातं, त्यावरून असंच वाटत असतं की गर्लफ्रेंड म्हणजे बॉयफ्रेंडकडून पैसे उकळणारी, किंवा आई- बाबा तिच्या ज्या मागण्या पुर्ण करत नाहीत, त्या मागण्या बॉयफ्रेंडकडून पुर्ण करून घेणारी... अशी काहीशी विचित्र इमेज तिची करून ठेवलेली असते. पण काही मोजके अपवाद सोडले, तर प्रत्यक्षात मात्र तसं नसतं. ती तिच्या बॉयफ्रेंडच्या पाठीमागे कशी भक्कमपणे उभी राहून त्याला मदत करू शकते, हे सांगणारी एक खरीखुरी लव्हस्टोरी सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. UPSC ची तयारी करणाऱ्या एका तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडविषयीचा छानसा किस्सा शेअर केला आहे. (UPSC student shares how his girlfriend supported him financially)
कोणत्याही हिंदी चित्रपटाची स्टोरी शोभावी, असाच तो किस्सा वाटतो. @iUtkarshNeil या सोशल मिडिया हॅण्डलवरून ही स्टोरी शेअर करण्यात आली आहे.
खाल्लंय का कधी हिरव्यागार मिरचीचं झणझणीत आईस्क्रिम? बघा तेजतर्रार आईस्क्रिमची ही व्हायरल रेसिपी
यामध्ये तो तरुण असं म्हणतोय की युपीएससीची तयारी करत असताना आम्ही भेटलो आणि एकमेकांच्या प्रेमात पडलो. आता ५ वर्षांपासून आम्ही रिलेशनमध्ये आहोत. तिने युपीएससीचा नाद सोडला आणि ती एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करू लागली. पण त्याने मात्र अजूनही प्रयत्न सोडलेले नाहीत. त्याने प्रयत्न सोडू नयेत, अपेक्षित यश मिळवावं, म्हणून ती नेहमीच त्याला प्रोत्साहन देत असते. पण याव्यतिरिक्तही ती त्याला अनेकदा आर्थिक स्वरुपातही मदत करते.
तो म्हणतो की एकदा तो तिला भेटायला तिच्या शहरात गेला होता. त्यानंतर ती जेव्हा त्याला सोडवायला रेल्वे स्टेशनवर आली, तेव्हा तिने त्याचं पाकिट पाहिलं. ते रिकामं होतं.
रोज फक्त ५ मिनिटं कानाला मसाज करा, स्ट्रेस- छातीतली धडधड होईल कमी- पाहा भन्नाट युक्ती
हे पाहून त्या प्रेमळ गर्लफ्रेंडने ताबडतोब त्याच्याही नकळत त्याच्या पाकिटात काही पैसे ठेवून दिले. हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा तिचं प्रेम आणि तिचा सपोर्ट पाहून त्याचे डोळे पाणावले आणि तो किस्सा त्याने लगेच सोशल मिडियावर शेअर केला.