सेलिब्रिटी नेहमीच आपापले फॅशन स्टेटमेंट सेट करत असतात. कोणत्याही सिलेब्रिटीने एखादे खास स्टायलिश पद्धतीचे कपडे घातले की लगेच त्याचा फॅशन ट्रेंड होतो. बॉलीवूडमधील जवळपास सर्वच अभिनेत्री या फॅशनीस्टा आहेत पण त्यातही प्रामुख्याने जिची फॅशन सर्वात जास्त गाजते ती म्हणजे अभिनेत्री सारा अली खान. जी सर्व प्रकारच्या पोशाखांमध्ये स्टायलिश आणि सुंदर दिसते. एथनिक लूक असो किंवा बोल्ड आउटफिट्स, सारा प्रत्येक लूकमध्ये चाहत्यांना प्रभावित करते. तिच्या एथनिक लूकबद्दल बोलायचे झाले तर, सारा अनेकदा सलवार सूटमध्ये तर कधी साडीमध्ये दिसते. सारा ही अनेकदा फॅशन प्रेमींसाठी अनेक प्रकारच्या प्रेरणा देते(Sara Ali Khan's hippie-inspired look).
सैफ अली खान याची मुलगी सारा अली खान अभिनय क्षेत्रात प्रवेश करण्याआधीपासूनच ती सोशल मीडियावर प्रसिद्ध होती, आणि ते म्हणजे तिच्या हटके फॅशन सेन्समुळे. आताही तिने घातलेल्या अजब प्रकारच्या ड्रेसिंग सेंन्समुळे तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कॅज्युअल हॉलिडे लूक असो किंवा ग्लॅमरस रेड कार्पेट गाऊन असो, सारा तिचा एकही लूक फेल जाऊ देत नाही. साराने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन (Sara Ali Khan Channels Her Hippie Vibe in Pink Striped Tee and Blue Denim Skirt) क्रोशेट टॉप आणि मॅक्सी स्कर्टमधील एक फोटो शेअर केला आहे(Loved Sara Ali Khan's hippie-inspired look in colourful crochet top and chic maxi skirt? Here's what it costs).
सारा अली खानच्या क्रोशेट टॉप आणि मॅक्सी स्कर्टची अजब गोष्ट...
गुरुवारी, साराने तिच्या चाहत्यांसाठी एक हटके फोटो इंस्टाग्रामवर अपलोड करुन एक गोड सरप्राईज दिले आहे. तिने तिच्या Instagram वर "हिप्पो फीलिंग हिप्पी, सारा स्क्रीमिंग यिप्पी" या विचित्र कॅप्शनसोबतच फोटोजची सिरीज अपलोड केली आहे. या पोस्टमध्ये, सारा रंगीबेरंगी, हिप्पी पोशाख परिधान करुन दिसते आहे. सारा अली खानाने क्रोशेट टॉप आणि मॅक्सी स्कर्ट घालून लंडनच्या रस्त्यांवर बिनधास्त अंदाजात हटके पोझ देत फोटो काढले आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर अगदी लगेच व्हायरल झाले आहेत. तिच्या या हटके फोटो सीरिजला ३ लाखांहून अधिक लाईक्स आणि तिच्या प्रेमळ चाहत्यांकडून अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.
महागड्या सिक्विन साडीची काळजी घेण्याच्या ६ टिप्स, नाहीतर चमचमती साडी पडेल काळी...
उरलेल्या साबणाचा तुकडा फेकून न देता करा घरातील अनेक कामं, इवलुसा साबणाचा तुकडा पण उपयोग भन्नाट...
सारा अली खानच्या या अजब - गजब पोषाखाची किंमत नेमकी किती ?
साराने घातलेल्या या कमालीच्या स्टायलिश लूकमध्ये तिने खास व्ही - नेकलाइन, फुल स्लीव्हज आणि काळी बॉर्डर असलेला मल्टी कलरचा क्रोशेटचा टॉप घातला आहे. या टॉपला परफेक्ट मॅचिंग असणारा फिकट निळ्या रंगाच्या डेनिम मॅक्सी स्कर्ट तिने घातला आहे. तळाशी फ्लेर्ड पॅटर्न असणारा हा स्कर्ट तिला अतिशय शोभून दिसत आहे. जर तुम्हाला साराचा ट्रेंडी लूक आवडला असेल आणि तिच्या पोशाखाची किंमत काय असेल याबद्दल विचार करत असाल तर तिच्या टॉपची किंमत ही $214 डॉलर आहे जी भारतीय रुपयांत ₹ १७,७८७ इतकी होते.
दिया मिर्झाच्या रिसायकल मिडी ड्रेसची चर्चा, जुन्या कपड्यांतले धागे वापरुन कसा बनवला नवा ड्रेस...
साड्या ठेवण्यासाठी कपाटात जागाच उरली नाही ? १ सोपी ट्रिक, छोट्याशा कपाटातही राहतील भरपूर साड्या...
तिचा टॉप टच क्लोदिंग या ब्रँडचा आहे. तिचा स्कर्ट फ्री पीपल या ब्रँडचा असून त्याची किंमत $168 डॉलर आहे जी भारतीय रुपयांत ₹ १३,९६३ इतकी आहे. अॅक्सेसरीजच्या बाबतीत, साराने ती अधिक आकर्षक व सुंदर कशी दिसेल याकडे विशेष लक्ष दिले आहे. बिन्नी कॅप, रंगीबेरंगी मण्यांचे हार, कंबरेची निळ्या रंगाची बॅग, चांदीची नाकातील नोज रिंग, तिने तिच्या बोटात रंगीत अंगठ्या घातल्या आहेत. तिने तिच्या खांद्यावर एक रंगीबेरंगी बोहो बॅग घेतली आहे. तिने गडद भुवया, गुलाबी रंगाची आयशॅडो, मस्करा लावून तिचा मेकअप लुक पूर्ण केला.