लोक पैसे कमावण्यासाठी काय काय उद्योग करतील सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच जॉब व्हायरल होत आहे. दुसऱ्यांच्या जोडीदारावर नजर ठेवाण्याचं काम. म्हणजे काय तर कॅरेक्टर टेस्ट. नवरा किंवा जोडीदार महिलेशी एकनिष्ठ आहे की नाही हे तपासण्याचं काम ही एक महिला करते.
ब्राझीलमध्ये सध्या एका वेगळ्याच प्रकारच्या नोकरीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. ही नोकरी फक्त सुंदर मुलींसाठी आहे, या कामाला लॉयल्टी इन्स्पेक्टर जॉब असे म्हणतात. म्हणजे काय तर जोडीदार एकनिष्ठ आहे की नाही हे ती महिला सांगते. त्यासाठी त्याला सौंदर्यासह प्रेमाच्या जाळ्यात ओढू पाहते. कोण पास/ कोण नापास यावर ठरते जोडीदाराची विश्वासार्हता.
या नोकरीमुळे बेरोजगार बसलेल्या सुंदर मुलींना पैसे मिळतात. काही हजार ते लाख रुपये या कामासाठी कराराप्रमाणे मिळतात.
या कामात सोशल मीडियाद्वारे सुंदर महिला सर्वप्रथम त्या पुरुषाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर त्यांच्यासह चॅटद्वारे जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करते. यात महिला त्यांना संदेश किंवा फोटो पाठवत राहते. यात जर जोडीदार त्यांच्या जाळ्यात अडकला तर, लॉयल्टी इंस्पेक्टर सर्व चॅट महिला ग्राहकांना पाठवते.
UOL Universa शी बोलताना एका 22 वर्षीय महिलेने सांगितले, "प्रसूतीनंतर मला काम मिळत नव्हते, मी घरी रिकामी बसली होती, त्यानंतर मला एक नोकरीची ऑफर आली. मी ही नोकरी केली आणि त्यानंतर मला अनेक महिला ग्राहकांचे संदेश येऊ लागले. या नोकरीची सध्या खूप चर्चा आहे".
रिपोर्ट्सनुसार, ही चाचणी फक्त ऑनलाइन केली जाते आणि याद्वारे महिलांना ४५ हजार ते सुमारे १ लाख रुपये मिळतात. काही महिला आणि मुली हे काम व्यावसायिकरित्या करतात, एका महिलेने सांगितले, ‘कधीकधी १० पैकी ८ पुरुष या परीक्षेत नापास होतात. मात्र, केवळ याच आधारे त्यांची निष्ठा तपासणे चुकीचे आहे. अनेक वेळा चाचणी करणाऱ्या महिलांसाठीही ही समस्या निर्माण होते. कारण अनेक पुरुष सुंदर महिलांचे संदेश पाहून रिप्लाय देतातच आणि जाळ्यात अडकतात.’