Join us  

खाण्यासाठी काही पण ! ऑनलाइन फूड ऑर्डर कॅन्सल झाली म्हणून तरुणीने केले असे काही...पाहा व्हायरल व्हिडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 5:34 PM

MacDonald employee canceled the girls order watch what she did by entering through the window : आपली ऑर्डर कॅन्सल केल्याचा राग मनात धरत मॅकडोनल्डला याबाबतचा जाब विचारायचा ठरवला.

ठळक मुद्दे कर्मचारी तिचा हा अवतार पाहून सुरुवातीला काहीसे गोंधळेल, तर काहींनी तिची थट्टा केली.खाण्यासाठी काही पण, असं अनेकांचं असतं, त्या नादात हे लोक काय करु शकतात पाहा

ऑनलाइन ऑर्डर करण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षात वेगाने वाढ झाली असून आपण घरबसल्या वेगवेगळ्या अॅपसच्या माध्यमातून आपले आवडीचे पदार्थ ऑर्डर करतो. इतकेच नाही तर आपण प्रवासात असलो तर आपण गाडीतून जाताना वाटेतील एखाद्या फूड शॉपमधून आपल्या आवडीचे काही खायला घेतो (Viral Video). काही फूड चेन ड्राईव्ह थ्रू सुविधा पुरवतात. म्हणजेच आपण गाडीत बसल्या बसल्या ऑर्डर द्यायची आणि ती ऑर्डर आपल्याला आपल्या गाडीपाशी आणून दिली जाते. मॅकडोनल्ड ही तर लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांना आवडणारी फूड चेन. मॅकडोनल्डकडूनही आपल्या ग्राहकांच्या सोयीचा विचार करुन अशाप्रकारची ड्राईव्ह थ्रू सुविधा दिली जाते (MacDonald employee canceled the girls order watch what she did by entering through the window).

(Image : Google)

एका महिलेने अशीच मॅकडोनल्डला ड्राइव्ह थ्रू ऑर्डर दिली. मात्र तिची ही ऑर्डर काही कारणाने कॅन्सल करण्यात आली. आता अशाप्रकारे ऑर्डर कॅन्सल झाल्यावर एकतर आपण पुन्हा ऑर्डर करु किंवा दुसरीकडे काहीतरी खाऊ. पण या महिलेने मात्र आपली ऑर्डर कॅन्सल केल्याचा राग मनात धरत मॅकडोनल्डला याबाबतचा जाब विचारायचा ठरवला. जाब विचारताना तिने काय केले हे पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कारण जाब विचारण्यासाठी मॅकडोनल्डच्या ऑर्डर विंडोपाशी येत या महिलेने लहानशआ खिडकीतून थेट मॅक डीच्या स्वयंपाकघरातच प्रवेश केला. 

या स्वयंपाकघरात जाऊन या महिलेने याठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना काही शिकवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर किचनमध्ये जाऊन तिने स्वत:साठी टेक अवे ऑर्डरही तयार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसते. याठिकाणचे कर्मचारी तिचा हा अवतार पाहून सुरुवातीला काहीसे गोंधळेल, तर काहींनी तिची थट्टा केली. तिचे हे वागणे कॅमेरात कैद झाले आणि त्याचा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट करण्यात आला. कालांतराने इतर सोशल मीडिया माध्यमांवरही हा व्हि़डिओ वेगाने व्हायरल झाला. या महिलेची ऑर्डर कॅन्सल होण्याचे कारण होते, की येथील कर्मचाऱ्यांचे सॅनेटरी हँडग्लोव्हज संपले होते. गुलाबी रंगाचा ड्रेस आणि हिल्स घातलेली ही महिला मॅकडोनल्डसच्या खिडकीतून कशाप्रकारे आत शिरते हे पाहून काही काळ आपल्यालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. 

टॅग्स :सोशल व्हायरलसोशल मीडिया