सोशल मीडियावर सतत काही ना काही नवनवीन ट्रेंड येत असतात. मग या ट्रेंडमध्ये हौसेने सहभागी होणारे नेटीझन्स या ट्रेंडला फेमस करतात. काही तासांत हा ट्रेंड इतका वाढतो की तुम्ही इन्स्टाग्राम अकाऊंट ओपन करायचा अवकाश तुम्हाला प्रत्येकाच्या वॉलवर त्या ट्रेंडचे फोटो किंवा व्हिडियो पाहायला मिळतात. नुकताच इन्स्टा आयफोन लॉकस्क्रीन चॅलेंज ट्रेंडमध्ये आहेत. सामान्यांबरोबरच प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षित आणि टेनिसपटू सानिया मिर्झा याही या ट्रेंडच्या प्रेमात पडल्या आहेत. माधुरी आणि सानियाबरोबरच हिना खान, गौहर खान, करिष्मा टन्ना,
नुकतेच त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या ट्रेंडचे रील पोस्ट केले आहेत. प्रत्येकजण या ट्रेंडमध्ये आपल्या पद्धतीने सहबागी होत असताना माधुरीने तिचा हटके अंदाज या रीलच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दाखवला आहे. माधुरी घरातील एका खुर्चीमध्ये अगदी बारीक स्ट्रीप असलेला वन पीस घालून बसलेली दिसत आहे. ‘बन्ना रे बागम झुला’ या चित्रलेखा सेनच्या गाण्यावरील या ट्रेंडमध्ये सुरुवातीला अजिबात न हालणाऱ्या व्यक्ती एकदम एखादी अॅक्शन करतात आणि पाहणाऱ्यांना फसवतात. तर माधुरी डोळा मारुन आपल्या खुर्चीत गोल फिरते आणि ज्या स्माईलसाठी लाखो चाहते तिच्यावर फिदा आहेत अशी गोड स्माईल देते. माधुरीने आपल्या या पोस्टला रिअल टू रील असे कॅप्शन दिले आहे.
तर सानिया मिर्झा एका कारमध्ये बसलेली असून कारच्या खिडकीकडे पाहून ती हे रील करत असल्याचे दिसते. तिचा हा रील तिच्या फॅन्समध्ये जोरदार व्हायरल होत आहे. या रीलला ती कॅप्शन देते, जेव्हा तुमचे मूल आजारी असते आणि २ तासांच्या झोपेवर सगळे काम सुरू असते. यामध्ये सानिया कोणत्याही मेकअपशिवाय असल्याचे दिसते. कारच्या खिडकीकडे बघणारी सानिया गाण्याचे बिटस आल्यावर एकाएकी हसताना दिसते. त्यामुळे तुम्ही कोणत्या ताणतणावात असाल तर हे रील काही वेळासाठी का होईना तुम्हाला थोडा रिलिफ मिळवून देऊ शकतात असे म्हणण्यास हरकत नाही. सानियाच्या रीलची जोरदार चर्चा असून फॅन्स तिच्या या रीलचे भरपूर कौतुक करताना दिसत आहेत.
काय आहे हा ट्रेंड ?
इन्स्टाग्रामवर सुरु झालेल्या या ट्रेंडमध्ये एक फिल्टर वापरला आहे, जो आयफोनच्या लॉकस्क्रीनसारखा दिसतो. रीलमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीला एकदम वॉलपेपर असल्यासारखे दिसायचे असल्याने एकदम स्थिर थांबायचे आहे. मग अचानक बन्ना रे हे गाणे वाजते आणि सहभागी व्यक्तीला एखादी हालचाल करत हा वॉलपेपर नव्हता असे दाखवायचे आहे. त्यामुळे आपल्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सना फसवणारा हा रील सध्या बऱ्याच चर्चेत आहे.