Join us  

माधुरी दीक्षितचा ३५ हजार रुपयांचा कलमकारी कुर्ता; कलमकारी पारंपरिक कलेची खास बात काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2021 3:56 PM

धकधक गर्लच्या कलमकारी कुर्त्याची भारीच चर्चा! आहे तरी कशी या कुर्त्यावरची हस्तकला? माधुरीचा हा कुर्ता सध्या भलताच चर्चेत आहे.

ठळक मुद्देकलमकारी हा प्रकार भारतातल्या काही प्रमुख हस्तकलांपैकी एक आहे. कलम म्हणजे बारीक आणि मऊ तारांचा कुंचला.

माधुरी दिक्षित म्हणजे बॉलीवूडचं माधुर्य. वयाची पन्नाशी ओलांडून देखील माधुरी कमालीची फिट दिसते. तिचे लाखो चाहते आज देखील तिच्या एका स्माईलवर फिदा असतात. अशी ही धक धक गर्ल माधूरी सध्या सोशल मिडियावर कमालीची ॲक्टीव्ह आहे. ती तिचे फोटो आणि व्हिडियो नेहमीच इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असते. तिचा प्रत्येक फोटो आणि व्हिडियो सध्या सोशल मिडियावर धुम करत असून माधूरीने घातलेले कपडे, साड्या हा तमाम महिला वर्गासाठी चर्चेचा विषय ठरला आहे. माधुरीचं कपड्यांचं अफलातून कलेक्शन तिचा परफेक्ट ड्रेसिंग सेन्स दाखवून देतो.

 

सध्या अशीच एक चर्चा सुरु आहे माधुरीच्या एका कुर्त्याची. हिरवट रंगाचा हा कुर्ता माधुरीला खूपच शोभून दिसतो आहे. या ड्रेसच्या बाह्या थ्री फोर्थ असून त्यावरचा व्ही नेक खूपच परफेक्ट वाटत आहे. थोडासा सैलसर असणाऱ्या या ड्रेसला माधुरीने स्ट्रेट फिट पँन्ट घालून ट्रेण्डी लूक दिला आहे. त्यावर मोतिया रंगाची ओढणी खरोखरंच माधुरीला ग्लॅमरस लूक देणारी आहे. लाँग कानातले आणि हातात सिल्व्हर रंगाच्या बांगड्या एवढीच ज्वेलरी माधुरीने घातली असून तिची सादगी तिच्या चाहत्यांना भारीच आवडली आहे. या ड्रेसचं वैशिष्ट्य म्हणजे हा कुर्ता कलमकारी प्रकारात मोडणारा आहे. माधुरीचा हा ड्रेस तब्बल ३५ हजारांचा आहे. 

photo credit- google

कलमकारी कलाकुसरीची जादूकलमकारी हा प्रकार भारतातल्या काही प्रमुख हस्तकलांपैकी एक आहे. कलम म्हणजे बारीक आणि मऊ तारांचा कुंचला. या प्रकारामध्ये लाकडी ब्लॉकच्या साहाय्याने कपड्यांवर काम केले जाते. यामध्ये प्रामुख्याने सुती कपड्यांवर काम केले जाते. भारत आणि ईरान या दोन देशांमध्ये या कलांचे मुळ सापडते. वरवर पहायला ही कला अतिशय सोपी वाटते. भरतकाम, वीणकाम यांच्यापेक्षा कलमकारी सोपे आहे, असेही वाटू लागते. पण आपल्याकडे असणारी साचेबद्ध नक्षी आपण किती नजाकतीने कपड्यांवर उमटवतो, यामध्येच या कलेचे खरे कौशल्य दडलेले आहे. 

photo credit- google

कशी करायची कलमकारी?ज्या कपड्यावर आपल्याला कलमकारी करायची आहे, त्या वस्त्राला रात्रभर गायीच्या शेणाच्या पाण्यात भिजवून ठेवात. दुसऱ्या दिवशी हा कपडा उन्हात वाळत घालतात आणि तो चांगला सुकवतात. यानंतर हा कपडा दुधात भिजत घालतात. यानंतर पुन्हा एकदा तो सुकवला जातो. ही सगळी क्रिया करून खूपच कडक पडलेल्या या कपड्याला लाकडी दस्त्याने ठोकले जाते. ठोकल्यामुळे मग हा कपडा मऊ पडतो. यानंतर असा कपडा कलमकारी करण्यासाठी योग्य होतो. नैसर्गिक चिन्हांचा वापर हे कलमकारीचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे झाड, पाने, फुले, वेली अशी चिन्हे कलमकारी कपड्यांमध्ये प्रामुख्याने दिसून येतात. कलमकारी करण्यासाठी प्रामुख्याने नैसर्गिक रंग वापरले जातात. त्यामुळेच कलमकारी ही एक इकोफ्रेंडली कला आहे, असे आपण म्हणू शकतो. 

 

photo credit - google

कलमकारीचे प्रकारभारतात कलमकारीचे दोन प्रमुख प्रकार आढळून येतात. मछिलिप्टनम कलमकारी आणि श्रीकलाहस्ती कलमकारी असे दोन प्रकार भारतात जास्त प्रचलित आहे. ब्लॉकवरचं डिझाईन आणि रंगकाम कसं आहे, यावरून हे प्रकार ठरतात. या दोन प्रकारांपैकी मछिलिप्टनम कलमकारी हा प्रकार जास्त प्राचीन असून आंध्रप्रदेशातील मछिलिप्टनम या प्रांतात ही कला जोपासली गेली आहे. गावाच्या नावावरूनच हा प्रकार ओळखला जातो. मुगलकाळात कलमकारी कलेतून बनविलेल्या हस्तशिल्प वस्तू मुगल काळात सजावटीसाठी वापरण्यात यायच्या, असं देखील याबाबत सांगितलं जातं. आता काळानुसार मशिनच्या साहाय्याने देखील कलमकारी करता येते. बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, काश्मीर, राजस्थान, गुजरात या प्रदेशातही आता आपली स्वतंत्र शैली दाखविणारी कलमकारी विकसित झाली आहे.  

टॅग्स :सोशल व्हायरलमाधुरी दिक्षितसेलिब्रिटीबॉलिवूडकलाफॅशन