Join us  

किती त्या मॅगीवर अत्याचार! मॅगी विथ पानमसाला पाहून नेटकरी म्हणाले....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2022 2:13 PM

Experiments With Maggi: हा मॅगीसोबत केलेला आणखी एक अतरंगी प्रयोग... खवय्ये आणखी किती वेगवेगळ्या पद्धतींनी मॅगीवर अत्याचार करणार, हे त्यांचं त्यांनाच माहिती..(weird food combination)

ठळक मुद्देमॅगी अशाही पद्धतीने खाता येते, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हीही एकदा नक्की बघा.

मॅगी म्हणजे करोडो भारतीयांचा आवडीचा पदार्थ... चहानंतर जर भारतीयांना कोणता दुसरा पदार्थ अधिक आवडत असेल तर कदाचित तो पदार्थ ५ मिनिटाेंमे तय्यार होनेवाली मॅगी (maggi)... हा असू शकतो. आणि म्हणूनच तर जेव्हा आपल्या प्रिय मॅगीसोबत असे वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि अक्षरश: तिच्यात काहीही टाकून, किंवा कसंही शिजवून खातानाचे व्हिडिओ शेअर होतात, तेव्हा अनेक मॅगीप्रेमींना (maggi lover) दु:ख होतं. आता बघा ना, हा असाच एक प्रयोग मॅगीसोबत करण्यात आला आहे. ''याची काय गरज होती?'', असा प्रश्न आता हा व्हिडिओ (viral video) पाहून नेटकरी विचारत आहेत आणि जाम वैतागले आहेत.(maggi with pan masala)

 

इन्स्टाग्रामच्याr_bam_tv7 या पेजवर मॅगीचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. जवळपास ८० हजार लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मॅगी अशाही पद्धतीने खाता येते, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्हीही एकदा नक्की बघा. आजवर तुम्ही भाज्या टाकून, चीज टाकून, किंवा बटर आणि वेगवेगळे मसाले किंवा सॉस टाकून मॅगी खाल्ली असेल. पण या व्हिडिओमध्ये तर एक महाशय चक्क मॅगीवर पान मसाला टाकून मॅगी खात आहेत... काय म्हणायचं आता या विचित्र प्रयोगाला?

 

या व्हिडिओमध्ये असं दिसत आहे की, एक तरुण गाडीवर बसला आहे. त्याच्याजवळ शिजवलेली मॅगी असणारी एक प्लेट आहे. मॅगीची प्लेट तो तशीच ठेवतो आणि त्याच्याकडे असणारी विमल पान मसालाची एक पुडी फोडतो. पुडीतला सगळा मसाला मॅगीवर टाकतो. छानपैकी मॅगी हलवतो आणि मग एकेक घास घेत ही ''मॅगी विथ पानमसाला'' फस्त करतो. एवढ्या खमंग सुवासाच्या मॅगीमध्ये जर पान मसाल्याचा वास एकत्र झाला, तर तो प्रकार किती विचित्र लागत असणार, हे त्या खाणाऱ्यालाच माहिती.. मॅगी लव्हर असो किंवा मग पान मसाला लव्हर.. हा 'मॅगी विथ पानमसाला' प्रयोग मात्र या दोघांनाही आवडलेला नाही, असंच या व्हिडिओला आलेल्या कमेंटवरून दिसत आहे. 

 

टॅग्स :सोशल व्हायरलइन्स्टाग्राममॅगीअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.