सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल, काही सांगता येत नाही. कधी एखाद्या पदार्थाची रेसिपी खूप ट्रेण्डिंग असते. तर कधी एकदा मजेशीर विनोदी व्हिडिओ खूपच गाजतो. लहान मुलांचे आणि प्राण्यांचे व्हिडिओ (Viral Video ) तर नेहमीच मोठ्या उत्सूकतेने पाहिले जातात. आता सध्या एका मेणबत्तीचा व्हिडिओ बराच चर्चेत आहे. यामध्ये विझलेली मेणबत्ती पुन्हा पेटविण्यासाठी (Relighting Candle Using its Smoke) जी काही युक्ती वापरली आहे, ती खरोखरच कमाल आहे.(Magic Of Science)
अर्थात या व्हिडिओमध्ये मेणबत्ती पेटविण्याची जी कोणती पद्धत दाखवली आहे, त्यात जादू वगैरे मुळीच नाही. त्यात एक विज्ञान आहे. पण ते ही अतिशय रंजक असल्याने हा व्हिडिओ अनेक जणांना आवडला आहे.
थंडीच्या दिवसांत इडलीचं पीठ आंबविण्यासाठी ५ खास टिप्स, इडल्या मस्त फुलून येतील- चवदार होतील
हा प्रयोग तुम्ही तुमच्या घरीही करून बघू शकता. घरात शाळेत जाणारी लहान मुलं असतील, तर त्यांनाही विज्ञानाची ही गंमत- जंमत बघायला नक्कीच आवडेल. Science girl या ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कशी पेटवली मेणबत्ती?साधारण 17 ते 18 वर्षांची मुलगी हा प्रयोग करते आहे. तिने सुरुवातीला मेणबत्ती पेटवली आणि ती विझवली. मेणबत्ती विझल्यानंतर त्यातून धूर निघाला. या धुराजवळ त्या मुलीने एक लायटर नेले.
फक्त १५ ते २० रुपयांत संक्रांत वाण म्हणून लुटता येतील अशा १० उपयोगी वस्तू.. बघा काय आवडतं
मेणबत्तीच्या वातीपासून साधारण १० ते १५ सेमी दूर होते. एवढ्या वर लायटर पकडूनही बरोबर त्या मेणबत्तीची वाट पुन्हा एकदा पेटवली गेली. याच्या मागचं विज्ञान सांगताना ती मुलगी म्हणते की मेणबत्ती विझल्यानंतर त्याचा जो धूर निघतो, त्यात पॅराफिन असतं. ते एक प्रकारे न जळालेलं इंधन असून त्यात ज्वलंत कार्बनही आहे. त्यामुळे जेव्हा आपण लायटर त्याच्या जवळ नेतो, तेव्हा ते जळतं आणि त्यामुळे मेणबत्तीही पुन्हा पेटते.