पूर्वीच्या काळी मोठी कुटुंब पद्धती घराघरात पाहायला मिळायची. वाढतं शहरीकरणं, महागाई, औद्योगिकीकरण यांमुळे जसजसं माणसांची प्रगती होत गेली तसतसं कुटुंबाचं स्वरूपही बदलत गेलं. सध्याच्या स्थितीत ग्रामीण भाग असो किवा शहर कमीत कमी २ ते जास्तीत जास्त ६ जणांचं कुटुंब एकत्र वास्तव्यास असलेलं पाहायला मिळतं. खूप कमी ठिकाणी १० च्या वर माणसं अजूनही एकजुटीनं एका घरात राहतात. (Maharashtra family 72 members 10 litres milk joint family rs 1200 worth vegetables)
एकिकडे जग छोट्या कुटंब पद्धतीकडे वळले असताना. सोलापूरातील एका कुटुंबात आजही १०, १२ नाही तर तब्बल ७२ लोक राहतात. वाचून तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरंय. लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांनी परिपूर्ण असं हे कुटुंब डोईजोडे संपूर्ण महाराष्ट्रातील मोठं कुटुंब आहे.
मूळचं कर्नाटकचं असलेलं हे कुटुंब जवळपास १०० वर्षांपूर्वी सोलापूरात स्थाईक झाले. डोईजोडे कुटुंबाला दररोज 10 लिटर दुधाची गरज असते आणि प्रत्येक वेळच्या जेवणासाठी 1000-1200 रुपयांचा भाजीपाला लागतो. अनंत रुपनागुडी या ट्विटर वापरकर्त्याने शेअर केलेल्या बीबीसीच्या व्हिडिओमध्ये मोठे संयुक्त कुटुंब दाखवण्यात आले होते.
व्हिडिओमध्ये कुटुंबातील एक सदस्य अश्विन डोईजोई यांनी या मुलाखतीदरम्यान सांगितले की, ''आम्हाला सकाळी आणि संध्याकाळी मिळून १० लिटर दूध लागत. दररोज जवळपास १२०० रुपयांचा भाजीपाला लागतो. मांसाहारी स्वयंपाक करायचा म्हटला तर जवळपास ३ ते ४ पटीनं जास्त खर्च येतो. ५ ते ६ हजार रुपये खर्च होतात.''
त्यात कुटुंबातील सदस्या नयना डोईजोडे यांनी सांगितले की, ''सुरूवातीला आम्हाला कुटुंबातील सदस्यांच्या संख्येवरून चिंता वाटायची. पण आम्ही सगळ्यांशी छान जुळवून घेतो. सुरूवातीला संपूर्ण कुटुंबाला कसं सांभाळून घ्यायचं याचं दडपण होतं. पण सासू, नंदा आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी मला इथे रुळायला मदत केली.''