'रईस' (Raees) चित्रपटातून रातोरात प्रकाशझोतात आलेली पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान (Mahira Khan), सोशल मिडीयात काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. तिने दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली असून, तिचे लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडीयात व्हायरल झाले आहे. प्रियकर सलीम करीमसोबत तिने निकाह केला.
यासंदर्भातील फोटो आणि व्हिडिओ मॅनेजरने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. मात्र, माहिरा दुसऱ्यांदा बोहल्यावर का चढली? पहिल्या नवऱ्यासह नक्की काय खटके उडाले? सिंगल मदरची भूमिका तिने कशी निभावली? पाहूयात(Mahira Khan's complex love journey: Marriage at 23 against parents' wishes, single motherhood at 25).
रईस चित्रपटादरम्यान झाला भयंकर आजार
माहीरा खान ही पाकिस्तानातील सर्वात लोकप्रिय व सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. मुख्य म्हणजे शाहरुख खानमुळे ती भारतात चर्चेत आली होती. शाहरुख आणि माहिराची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र, या चित्रपटादरम्यान तिला भयंकर आजार झाल्याचे निष्पन्न झाले.
लग्नाचा निर्णय घेताना तरुणीने भावी नवऱ्याला विचारायला हवा एक प्रश्न, उत्तर चुकले तर...
'एफव्हाय पॉडकास्टच्या' मुलाखतीत ती सांगते, 'रईस चित्रपटानंतर, जेव्हा २०१६साली उरी हल्ला झाला. तेव्हा पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर मला बायपोलर डिसऑर्डर डायग्रोसिक म्हणजेच पॅनीक अटॅक येऊ लागले. त्यावेळी लोक सतत माझ्याविरोधात ट्विट करत होते. मला फोनवरून धमक्या येत होत्या. माझा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित नाही झाला. ज्यामुळे मी साधारण ७ वर्ष डिप्रेशन घालवण्यासाठी औषधे घेत होती.'
सिंगल मदरचा प्रवास
माहिराने २००७ साली अली अस्करीसोबत लग्न केले होते. दोघांची भेट लॉस एंजेलिसमध्ये झाली होते. अली हा अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता आहे. माहिरा खान हिने वयाच्या २४ व्या वर्षी अझलानला जन्म दिला. पण २०१५ साली दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. माहिराने आपल्या मुलाला सिंगल मदर म्हणून वाढवले. एका मुलाखतीत माहिरा म्हणाली होती की, 'मी एकावेळी एकच चित्रपट करते. माझे पहिले प्राधान्य माझे मूल आहे. हे खूप कठीण आहे, परंतु, कधी कधी चांगले कामही सोडावे लागते.'
डोळ्यावर झापडं लावून लग्नाचा निर्णय घेताय की रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग दिसतात तुम्हाला?
माहिराचा दुसरा नवरा नक्की आहे कोण?
सलीम करीम हे व्यवसायाने व्यापारी आहेत. पब्लिशएक्स या संस्थेचे ते सह-संस्थापक आहे. माहिरा आणि सलीम २०१७ साली 'टॅपमॅट' नामक छोट्या पडद्यावरील कार्यक्रमादरम्यान पहिल्यांदा भेटले. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान त्यांची चांगली मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. डेटिंगनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.