Lokmat Sakhi >Social Viral > मोजून १० मिनिटांत घरी तयार करा धूपकांडी, निर्माल्याची फुलं-नारळाच्या शेंड्यांचा सुगंधी उपयोग

मोजून १० मिनिटांत घरी तयार करा धूपकांडी, निर्माल्याची फुलं-नारळाच्या शेंड्यांचा सुगंधी उपयोग

Make Dhoop sticks at home in 10 minutes : आता घरीच तयार करा सुगंधी धूपकांडी. घर ठेवा मस्त सुगंधी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2025 20:32 IST2025-02-20T20:30:03+5:302025-02-20T20:32:50+5:30

Make Dhoop sticks at home in 10 minutes : आता घरीच तयार करा सुगंधी धूपकांडी. घर ठेवा मस्त सुगंधी.

Make Dhoop sticks at home in 10 minutes | मोजून १० मिनिटांत घरी तयार करा धूपकांडी, निर्माल्याची फुलं-नारळाच्या शेंड्यांचा सुगंधी उपयोग

मोजून १० मिनिटांत घरी तयार करा धूपकांडी, निर्माल्याची फुलं-नारळाच्या शेंड्यांचा सुगंधी उपयोग

घराची प्रसन्नता घर साफ असलं की वाढते. तसेच घरातील वासानेही वाढते. छान सुगंध घरात आला की, मन अगदी प्रफुल्लित होऊन जाते. (Make Dhoop sticks at home in 10 minutes)पण रूमफ्रेशनर्स किंवा अगरबत्तीचा वास कधीकधी फारच उग्र येतो. अनेकांचे अशा वासाने डोके दुखायला लागते. फार पूर्वीपासून आपल्याकडे धूपकांडीचा वापर केला जातो. जेव्हा भारतात फ्रेशनर वगैरे संकल्पनाही माहिती नव्हती, तेव्हापासून आपल्याकडे धूपाचा वापर केला जात आहे.(Make Dhoop sticks at home in 10 minutes)

 धूप पवित्र मानला जातो. त्यामुळे पूजेत वगैरे तो  वापरतात. यंदा महाशिवरात्रिला घरी तयार केलेला धूप वापरा. रोज वापरण्यासाठीही चांगलाच. (Make Dhoop sticks at home in 10 minutes)मुख्य म्हणजे ज्या गोष्टी आपण निरुपयोगी म्हणून फेकून देतो. त्याचा यामध्ये वापर करायचा आहे. त्यामुळे सहज उपलब्ध होणाऱ्या सामग्रीचा वापर करून ही धूपकांडी तयार केली जाते. आजकाल बाजारात मिळणारा धूपही फार उग्र असतो. त्यामुळे घरी तयार केलेला कधीही चांगला. 

साहित्य
 नारळाची शेंडी, वाळवलेली गोंड्याची फुले, कोणतीही आवडीची वाळवलेली फुले, लवंग, कापूर, तूप, गुलाब पाणी , दालचिनी

कृती
१. नारळ सोलून झाला की  नारळाच्या शेंड्या फेकू नका. त्यांचा वापर धूप तयार करण्यासाठी करा. तसेच वापरून झालेली फुलेही फेकून देण्याऐवजी यात वापरू शकता. जर निर्माल्य वापरायचे नसेल तर, साधी फुले दिवसभर उन्हात ठेवा मग वापरा.

२. मिक्सरच्या भांड्यात वाळलेल्या गोंड्याच्या पाकळ्या घ्या. त्या मध्ये इतर तुमची आवडीची फुलेसुद्धा वापरा. मोगरा असेल, गुलाब असेल कोणतीही फुले वापरा. फक्त ती जरा वाळवून घ्या. 

३. त्यामध्ये कापूर घाला. २ ते ४ लवंगा घाला. दालचिनी घाला.  नारळाच्या शेंड्या घाला. ते सगळं मस्त वाटून घ्या. थोडं जाडसरच ठेवा. 

४. मिक्सरच्या भांड्यामधून एका ताटलीत काढा. त्यात तूप घाला. गुलाब पाणी घाला.  सगळं मस्त मळून घ्या. त्याच्या धूपकांड्या तयार करून घ्या. त्या जरा वाळवून घ्या. 

फार छान वास येतो. यात कोणतीही रसायने नाहीत. स्वत: तयार करून वापरायचा आनंदही मिळतो.      
 

Web Title: Make Dhoop sticks at home in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.