Lokmat Sakhi >Social Viral > "माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

Viral Video of A Cute Little Girl: मला जशी पाहिजे आहे, तशीच वेणी घालून दे... असं म्हणणाऱ्या या चिमुकलीने बघा तिच्या आईचा कसा पिच्छाच पुरवला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2022 08:52 PM2022-11-08T20:52:41+5:302022-11-08T20:53:37+5:30

Viral Video of A Cute Little Girl: मला जशी पाहिजे आहे, तशीच वेणी घालून दे... असं म्हणणाऱ्या या चिमुकलीने बघा तिच्या आईचा कसा पिच्छाच पुरवला आहे.

"Make my braid like this...", Cute little girl giving instructions to her mother about making her hair | "माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

"माझी वेणी अशीच घाल...", आईकडे हट्ट करून बसणाऱ्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल, बघा ही प्रेमळ गोष्ट

Highlightsनेटिझन्सला ती मुलगी, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा इनोसन्स खूप आवडले आहेत. त्याशिवाय तिच्या आईचंही त्यांना भारीच कौतूक वाटत आहे.

वय वर्षे अवघं ४ ते ५ वर्षे. पण या वयातही आपल्याला जे हवं आहे ते आणि अगदी जसंच्या तसं आपल्या आईकडून करून घेणारी ही धिटुकली सध्या सोशल मिडियावर (Social Viral) चांगलीच व्हायरल झाली आहे. हल्लीची पिढी स्मार्ट आहे, असं म्हणतात ते काही उगाच नाही. आता व्हिडिओमधली (viral video of Cute little girl) चिमुकली ज्या वयाची आहे, त्या वयात असताना आम्हाला नीट केस विंचरणंही कळायचं नाही. हेअरस्टाईल तर खूपच लांबची गोष्ट.. असं म्हणणारे अनेक लोक आहेत. पण आजच्या जमान्याची ही नवी पिढी बघा खरोखरच कशी स्मार्ट आहे ते..

 

thehannafamily_ या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक अतिशय गोड चिमुकली आणि तिची आई दिसत आहेत. मुलगी आरशासमोर उभी आहे आणि तिची आई तिची हेअरस्टाईल करून देते आहे. हेअरस्टाईल कशी करायची, याविषयी आधी ती आईला खूप सूचना देते.

नेकलेस डिझाईन ब्लाऊज पॅटर्न!! बघा १० आकर्षक पर्याय, असं ब्लाऊज असेल तर नेकलेसची गरजच नाही

आई ते सगळं मुकाट्याने ऐकते आणि तिची हेअरस्टाईल करते. दोन पुढे आणि एक मागे अशा तिच्या ३ वेण्या घालते. पण मुलीला मुळी तसं नकोच असतं. ती सरळ आईला नाही म्हणते आणि तिच्याकडून पुन्हा तिला हव्या होत्या, तशा उंच दोन वेण्या घालून घेते.

 

नेटिझन्सला ती मुलगी, तिची बोलण्याची पद्धत आणि तिचा इनोसन्स खूप आवडले आहेत. त्याशिवाय तिच्या आईचंही त्यांना भारीच कौतूक वाटत आहे.

तुम्हीही नेहमी रेडी टू इट पदार्थ, पाकिटबंद सूप, फ्रोझन पिझ्झा खाता? तातडीने हा अभ्यास वाचा...

एक हेअरस्टाईल आवडली नाही, म्हणून तेवढेच पेशन्स ठेवून मुलीला ती अगदी शांतपणे दुसरी तिच्या मनासारखी हेअरस्टाईल करून देते. ही तिच्या आईची गोष्ट अनेकांना कौतुकास्पद वाटते आहे. 
 

Web Title: "Make my braid like this...", Cute little girl giving instructions to her mother about making her hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.